एक्स्प्लोर
‘शोले’ची 42 वर्षे… पहिल्या समीक्षणात बिग बींचं नावही नव्हतं!
सुपरहिट ‘शोले’ सिनेमाच्या प्रदर्शनाला 42 वर्ष झाली आहेत. 15 ऑगस्ट 1975 रोजी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका असलेला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
मुंबई : सुपरहिट ‘शोले’ सिनेमाच्या प्रदर्शनाला आज 42 वर्षे पूर्ण झाली. 15 ऑगस्ट 1975 रोजी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका असलेला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
विशेष म्हणजे ‘शोले’ प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातील या सिनेमाकडे फार कुणी लक्ष दिले नव्हते. समीक्षकांनीही ‘शोले’ची म्हणावी तितकी दखल घेतली नव्हती.
याच काळात ‘जय संतोषी माँ’ हा सिनेमा अधिक वरचढ ठरताना दिसत होता. मात्र, नंतर ‘शोले’ सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि पुढे तर या सिनेमाने ऐतिहासिक लोकप्रियता कमावली.
विशेष म्हणजे सुरुवातीच्या काही समीक्षणपर लेखांमध्ये समीक्षकांनी महानायक अमिताभ बच्चन यांचा साधा उल्लेखही केला नव्हता.
‘बॉलिवूड लाईफ’च्या एका वृत्तानुसार, एका इंग्रजी वर्तमानपत्राने शोल सिनेमाच्या समीक्षणामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांचा उल्लेखही केला नव्हता. अमिताभ यांचा उल्लेख ‘धरम का दोस्त’ असा केला होता. त्याचवेळी अमजद खान यांच्या नावाचा उल्लेख मात्र होता.
दरम्यान, अजूनही शोले सिनेमाचं गारुड भारतीय प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement