एक्स्प्लोर
Advertisement
स्पेशल रिपोर्ट: अमिताभच्या पुनर्जन्माची 36 वर्ष!
अमिताभ डमी वापरत नव्हते. कुलीत अमिताभ उंचावरुन टेबलवर आणि तिथून खाली पडतात, असा सीन होता.. आणि इथंच घात झाला.
मुंबई: सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, बाळासाहेब ठाकरे हे एकदाच जन्माला येतात.. त्यांचं कौतुक सगळ्यांना आहे. क्रिकेटर, अभिनेते कमी नाहीत. पण सातत्य त्यांना युनिक बनवतं. हे सगळं सांगण्याचं कारण आहे कुली रिलीज होऊन 2 ऑगस्टला 36 वर्ष झाली. आणि अमिताभच्या पुनर्जन्मालाही 36 वर्ष झाली.
हमारी तारीफ जरा लंबी है... बचपन से सर पे है अल्ला का हाथ और अल्लाहरखा अपने साथ बाजू पे 786 का है बिल्ला.. 20 नंबर की बिडी पिता हूँ.. काम करता हूँ कुली का और नाम है इक्बाल..
कुलीमधला हा डायलॉग. कुलीमध्ये अमिताभ स्क्रीनवर आला की पब्लिक अख्खं थिएटर डोक्यावर घेतं... शिट्ट्या आणि टाळ्यांचा पाऊस पडतो. आजही 36 वर्षांनी कुली सुपरडुपरहिट आहे.
त्याचं कारण अमिताभचा तगडा अभिनय तर आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त त्याला मिळालेला दुसरा जन्म.
वर्ष होतं 1982. आणि दिवस होता 26 जुलैचा. अमिताभ कुलीसाठी बंगलोर युनिव्हर्सिटीच्या कँपसमध्ये शुटिंग करत होते. कुलीमध्ये बरेच स्टंट्स होते. पण अमिताभ डमी वापरत नव्हते. कुलीत अमिताभ उंचावरुन टेबलवर आणि तिथून खाली पडतात, असा सीन होता.. आणि इथंच घात झाला.
पुनित इस्सारची खरोखर बसलेली फाईट आणि टेबलावर पडताना चुकलेलं जजमेंट यामुळे अमिताभ गंभीर जखमी झाले. अमिताभ जखमी झाल्याची बातमी कळताच बच्चन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. देशात खळबळ उडाली. ठिकठिकाणी लोकांनी होमहवन, प्रार्थना सुरु केली. माजी पंतप्रधान राजीव गांधींनी आपला अमेरिकेचा दौरा रद्द केला. ते स्वत: रुग्णालयात हजर होते.
हम मजदूरों का सीना लोहे की दिवार है.. और ये हमारे हथियार है.. ये हमारा पेट पाल भी सकते है और तुम जैसो का पेट फाड भी सकते है.
यानंतर अमिताभला एअर अँब्युलन्सनं ब्रीच कँडीत हलवण्यात आलं. तिथं गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पार पडल्या. त्यानंतर अमिताभ वर्षभर काहीच करु शकले नाहीत.
अमिताभ फायटर माणूस आहे. मृत्यूची गाठभेट घेऊन, त्याला निरोप देऊन ते परत आले. त्यांनी जानेवारी 1983 मध्ये पुन्हा कुलीचं शुटिंग सुरु केलं. चित्रपट पूर्ण केला. जो ब्लॉकबस्टर ठरला. 1983 पर्यंत 100 कोटीपेक्षा अधिकचा धंदा करणारे 13 सिनेमे प्रदर्शित झाले होते, त्यातले 9 अमिताभचे होते. आणि कुलीनं तर कमाईचे सगळे विक्रम मोडीत काढले.
कुलीच्या ओरिजिनल स्क्रीप्टमध्ये कादर खान अमिताभवर गोळी झाडून त्याला ठार करतो, असा सीन होता. पण मृत्युला चकवा देणाऱ्या अमिताभमुळे दिग्दर्शक मनमोहन देसाईंनी स्क्रीप्ट बदलली. अमिताभला जिवंत दाखवण्यात आलं.
शतकातून एक अमिताभ जन्माला येतो. तो अनेकांचा श्वास, जगणं, प्रेरणा बनतो. त्या अमिताभला, बिग बीला दीर्घायुष्य लाभो इतकंच.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement