(Source: ECI/ABP News/ABP Majha)
श्रेयसनं तळपदेनं सांगितलं हार्टअटॅकनंतर अक्षयसोबत फॉलो केलेलं रुटीन, म्हणाला, 'अक्षय कुमारचा आयुष्यभर ऋणी'
श्रेयस तळपदेनं हार्टॲटॅकनंतर पहिल्या दिवसापासून मला ताब्यात घेत माझ्या जेवणाखाण्याच्या, वर्कआऊटच्या सवयींचं रुटीन त्यानं मला सेट करून दिलं.
Shreyas Talpade: अक्षय कुमार कायमच त्याच्या एनर्जीसाठी ओळखला जातो. त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, झोपण्याच्या आणि उठण्याच्या सवयीही अत्यंत काटेकोरपणे तो पाळतो. त्याच्या याच सवयींनी त्याच्या सोबत काम करणाऱ्या कलाकारांनाही खूप फायदा होतो. नुकताच बॉलिवूड, मराठी आणि आता साऊथ गाजवणारा अभिनेता श्रेयस तळपदे याने वेलकम टू जंगल सिनेमाच्या शुटिंगदरम्यान हृद्यविकाराचा झटका आल्याचं सांगत अक्षयनं त्याला त्याचं रुटीन पाळण्यासाठी कशी मदत केली हे एका मुलाखतीत सांगितलं.
कॅचअप या युट्यूबचॅनलला दिलेली त्याची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर चांगलीच फिरताना दिसत आहे. यात श्रेयस तळपदेनं हार्टॲटॅकनंतर पहिल्या दिवसापासून मला ताब्यात घेत माझ्या जेवणाखाण्याच्या, वर्कआऊटच्या सवयींचं रुटीन त्यानं मला सेट करून दिलं. त्याप्रमाणेच मी सकाळी 7.30 ला नाश्ता करायचो. अक्षय त्याआधीच व्यायाम वगैरे करून यायचा. मग आम्ही एकत्र नाश्ता करायचो. जेवणासाठी आमची सगळी टीम असायची. अक्षय जेवणाचं माझ्यासाठी वेगळं सांगून करून घ्यायचा. त्यात सॅलड वगैरे असायचे. 12.30 वाजता आम्ही जेवायचो.
रात्रीचं जेवण संध्याकाळी 6.30 वाजता
रात्रीचं जेवण संध्याकाळी 6.30 वाजता तयार असायचं. मग पुन्हा सकाळी 7.30 ला नाश्त्याला अक्षयला भेटायचो. अक्षयने मला एक रुटीन सेट करून दिलं होतं. मला त्याची खूप मदत झाली. असं म्हणत श्रेयसनं अक्षयने केलेल्या मदतीवर कृतज्ञता दाखवली. सध्या अक्षय कुमारसोबत श्रेयस वेलकम टू जंगल सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
View this post on Instagram
वर्षभरापूर्वी श्रेयसला हार्टअटॅक
अभिनेता श्रेयस तळपदेला 14 डिसेंबर 2023 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यानं एका मुलाखतीत तो क्लिनिकली डेड असल्याचं त्यानं सांगितलं होतं. गेल्या अडीच वर्षांपासून न थांबता काम करत असल्यानं गेल्या काही महिन्यांपासून त्याला खूप थकवा आल्याचंही तो म्हणाला होता. वेलकम टू जंगल या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानच त्याला हार्टअटॅक आला. तो बरा होऊन आता पुन्हा या सिनेमाचं शुटिंग सुरु झालं आहे. यानंतर त्यानं अक्षय कुमारनं त्याचं रुटीन फॉलो करण्यासाठी केलेल्या मदतीचा फायदा झाल्याचं एका मुलाखतीत सांगितलं आहे.
'झुकेगा नही साला' म्हणत घरोघरी पोहोचला
श्रेयसने अभिनयाव्यतिरिक्त डबिंग क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशभरात ब्लॉकबस्टर ठरलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाचं हिंदी डबिंग श्रेयसने केलं आहे. घराघरांत गाजणारा ‘झुकेगा नहीं साला’ हा डायलॉग अल्लू अर्जुन म्हणताना दिसत असला तरीही, यामागचा खरा ‘पुष्पा’ आपला मरामोळा श्रेयस तळपदे आहे.