![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Salaam Venky Review : आपल्या मुलासाठी इच्छामरण मागणाऱ्या आईची मन सुन्न करणारी कहाणी; वाचा संपूर्ण रिव्ह्यू
Salaam Venky movie review : ही कथा कोलावेन्नू वेंकटेश नावाच्या मुलाची कथा आहे ज्याला DMD म्हणजेच Duchenne muscular dystrophy नावाचा आजार आहे.
![Salaam Venky Review : आपल्या मुलासाठी इच्छामरण मागणाऱ्या आईची मन सुन्न करणारी कहाणी; वाचा संपूर्ण रिव्ह्यू bollywood Salaam Venky review kajol and Vishal Jethwa movie review marathi news Salaam Venky Review : आपल्या मुलासाठी इच्छामरण मागणाऱ्या आईची मन सुन्न करणारी कहाणी; वाचा संपूर्ण रिव्ह्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/09/3ccf037ed9b8ab125a11bc5816b23dc71670584684746358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Salaam Venky movie review : आयुष्य लांबलचक नसून मोठं असायला हवं. एखादी आई स्वतःच्या मुलासाठी इच्छामरणाची मागणी करू शकते आणि त्यासाठी कोर्टात जाऊ शकते. तुम्ही विचार करत असाल की एक आई असं का करेल? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सलाम वेंकी (Salaam Venky) हा सिनेमा पाहिल्यानंतर मिळतील. सलाम वेंकी पाहिल्यानंतर तुम्हाला टाळ्यांचा, शिट्टयांचा आवाज नाही येणार. हो, पण आवाज येईल आणि तो तुमच्या मनातून येईल. आणि हा आवाज तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की ऐका.
चित्रपटाचे कथानक
ही कथा कोलावेन्नू वेंकटेश (kolavennu venkatesh) नावाच्या मुलाची कथा आहे ज्याला DMD म्हणजेच Duchenne muscular dystrophy नावाचा आजार आहे. हा एक दुर्मिळ आजार आहे जो जगात फार कमी लोकांना होतो आणि त्यावर कोणताही इलाज नाही. या आजारात रुग्णाचा मृत्यू निश्चित आहे. आणि त्याला खूप वेदनाही सहन कराव्या लागतात. वेंकीला त्याचे अवयव दान करण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी त्याला इच्छामरणाचा सहारा घ्यायचा आहे. सुरुवातीला वेंकीची आई या गोष्टीशी सहमत नसते. पण मग आईला मुलाचा हट्ट स्वीकारावा लागतो. मात्र इच्छामरण हे बेकायदेशीर आहे. आता कायदा बदलण्यासाठी एका आईला कसा लढा द्यावा लागतो ही या चित्रपटाची कथा आहे. आणि ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे. 2004 मध्ये या आजाराने व्यंकटेश नावाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर इच्छामरणावर बरीच चर्चा झाली होती.
अभिनय
काजोलने (Kajol) आईची भूमिका अप्रतिम साकारली आहे. एक आई कशी आपल्या मुलासाठी मरणाची मागणी करते. या पात्रातून काजोलने ही भूमिका छान निभावली आहे. काजोलला आतापर्यंत आपण अनेक नखरेबाज भूमिकेत पाहिले आहे. मात्र, या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळीच काजोल दिसली. आणि तिने मन जिंकून घेतलं. वेंकीच्या व्यक्तिरेखेतील विशाल जेठवाचा (Vishal Jethwa) अभिनय जबरदस्त आहे. तो तुम्हाला रडवतो आणि खूप हसवतोसुद्धा. या सिनेमाचा प्राण विशाल आहे. राजीव खंडेलवाल डॉक्टरच्या भूमिकेत आहे आणि त्याने ही भूमिका उत्तम साकारली आहे. आहाना कुमरा पत्रकार झाली आहे आणि ती देखील खूप छान भूमिका साकारते. वकिलाच्या भूमिकेत राहुल बोसचं कामही चांगलं आहे. प्रकाश राज यांनीही न्यायाधीशाच्या भूमिकेत चांगलं काम केलं आहे.
दिग्दर्शन
चित्रपटाचे दिग्दर्शन रेवतीने केले आहे आणि तिचे दिग्दर्शन अप्रतिम आहे. रेवतीने ज्या प्रकारे भावनांना एकसंध बांधून ठेवले आहे. त्यामध्ये ती पूर्णपणे यशस्वी झाली आहे. चित्रपटाचे संगीत खूप छान आहे आणि कथेचा वेग खूप चांगला आहे. मिथुनने संगीतावर अप्रतिम काम केले आहे.
हा एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट आहे. हा मसाला चित्रपट नसून असे चित्रपट पाहायला हवेत. कारण चांगला सिनेमा पाहायला हवा.
महत्त्वाच्या बातम्या :
Vadh Review: हा थ्रिलर चित्रपट पाहताना स्क्रिनवरुन नजर हटणार नाही, संजय मिश्रा यांचा दमदार अभिनय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)