उर्मिला मातोंडकरांनी मुंबईत कार्यालय खरेदी करताच कंगना म्हणते, 'काश मैं भी....'
तिथं उर्मिला यांनी मुंबईत या नव्या जागेची खरेदी केली आणि तिथं अभिनेत्री (kangana ranaut) कंगना रनौतनं पुन्हा एकदा एक ट्विट करत नव्याच वादाला तोंड फोडल्याचं पाहायला मिळालं.
मुंबई : अभिनयाकडून कलाविशअवाकडे वळलेल्या उर्मिला मातोंडकर (urmila matondkar) यांच्या नावाची चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच तग धरु लागली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार उर्मिला यांनी नुकतंच मुंबईतील खार लिंक रोड इथं एका कार्लायलयाची खरेदी केली आहे. ज्याची किंमत ऐकून अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत. तिथं उर्मिला यांनी मुंबईत या नव्या जागेची खरेदी केली आणि तिथं अभिनेत्री (kangana ranaut) कंगना रनौतनं पुन्हा एकदा एक ट्विट करत नव्याच वादाला तोंड फोडल्याचं पाहायला मिळालं.
ट्विट करत उर्मिलांवर साधला निशाणा...
मुंबईत कार्यालयाची खरेदी करण्याबाबतची माहिती मिळताच आणि उर्मिला यांचं नाव पुढे येताच कंगनानं एक ट्विट केलं. यामध्ये तिनं लिहिलं, 'प्रिय उर्मिलाजी मी स्वत:च्या मेहनतीनं घरं उभी केली. पण, तीसुद्धआ काँग्रेस तोडत आहे. खरंच भाजपला आनंदी करुन माझ्या हाती फक्त 25-30 प्रकरणं लागली. मीसुद्धा तुमच्याइतकी हुशार असती तर, काँग्रेसला आनंदी केलं असतं. किती वेडी आहे मी ना?
उपरोधिक स्वरात ट्विट करत कंगनानं राजकीय पक्षावरही या ट्विटमधून निशाणा साधला. आता यावर अद्यापही उर्मिला यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळं आता या मुद्द्यावरुन आणखी कोणता वाद डोकं वर काढू शकतो हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी 2020 या वर्षाच्या अखेरीसच या जागेचा अंतिम व्यवहार करण्यात आला. जवळपास 1000 चौरस फुटांची ही जागा मोक्याच्याच ठिकाणी असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील खार पश्चिम भागात असणाऱ्या लिंकिंग रोड इथं त्यांच्या ऑफिसची इमारत आहे. शिवाय इथं कार्यालयीन जागांसाठी दरमहा 5-8 लाख रुपये इतकं भाडं आकारलं जातं. उर्मिला यांचं नवं ऑफिस इथं सहाव्या मजल्यावर आहे. एका व्यावसायिकाकडून त्यांनी या जागेची खरेदी केली असून, यासठी तब्बल 3.75 कोटी इतकी मोठी रक्कम मोजल्याचं म्हटलं जात आहे.