एक्स्प्लोर

कंगनाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर; बॉलिवूडची ‘क्वीन’ भावूक

सोमवारी सकाळच्या सुमारास हिमाचल प्रदेशातील मनाली येथे असणाऱ्या कुटुंबाच्या मूळ घरी तिनं धाव घेतली. पण, तिथं पोहोचेपर्यंतच कंगनाच्या अतिशय जवळच्या व्यक्तीनं या जगाचा निरोप घेतला होता.

मुंबई : नेहमीच विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात अडकणारी अभिनेत्री Kangana Ranaut कंगना राणौत सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिच्या एका पोस्टमुळं सर्वांचं लक्ष वेधून जात आहे. यावेळी बी- टाऊनची ही क्वीन काहीशी भावूक असल्याचं पाहायला मिळालं. कारणंही तसंच होतं. आजोबांच्या निधनामुळं कंगनाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सोमवारी सकाळच्या सुमारास हिमाचल प्रदेशातील मनाली येथे असणाऱ्या कुटुंबाच्या मूळ घरी तिच्या आजोबांचं निधन झालं. ट्विटरच्या माध्यमातून कंगनानं याबाबतची माहिती दिली. आपले आजोबा ब्रह्म चंद राणौत यांचं निधन झाल्याचं सांगत तिनं या ट्विटमध्ये सोबत त्यांचा एक फोटोही जोडला. शिवाय एका संदेशाद्वारे भावनांना वाट मोकळी करुन दिली.

आजोबांचा एक जुना फोटो शेअर करत आपण आजोबांना प्रेमानं ‘डॅडी’ म्हणूनही हाक मारायचो, अशी एक आठवण जागवली. आजोबांच्या विनोदबुद्धीचा उल्लेख करत तिनं या ट्विटमध्ये लिहिलं, ‘आज संध्याकाळी मी आईवडिलांच्या घरी गेले. मागील दोन महिन्यांपासून माझ्या आजोबांची प्रकृती ठीक नव्हती. मी घरी पोहोचले, पण त्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतलेला होता.’

आजोबांच्या आठवणी जागवत कंगनानं ही पोस्ट शेअर केल्यानंतर फॉलोअर्सनी तिच्या कुटुंबाला आधार देत आजोबांना श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, कंगनाचं नाव सध्या अभिनेता हृतिक रोशन याच्याशी असणाऱ्या वादामुळंही अनेकांच्या भुवया उंचावत आहे. तर, दुसरीकडे ती सध्या करिअरमधील महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. ‘थलैवी’ Thalaivi असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. ज्यामध्ये ती जयललिता यांच्या व्यक्तिरेखेत झळकणार आहे. मागील काही दिवसांपासून तिच्या या आगामी चित्रपटातील अनेक लूक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटाव्यतिरितक्त कंगना ‘तेजस’ या चित्रपटातूनही झळकणार आहे. ज्यामध्ये ती एका वायुदल वैमानिकाच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाच्या निमित्तानं कंगनानं नुकतीच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. यावेळी तिनं सिंह यांना चित्रपटाची स्क्रीप्ट देत काही बाबतीतील परवानगीही मिळवल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं तिच्या या आगामी चित्रपटांबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
Prashant Damle On NEET Protest: 'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ! 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स, ब्रँड्सची मोठी यादी; कोण आहे ऐश्वर्या हरिशंकर ?
एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ! 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स, ब्रँड्सची मोठी यादी; कोण आहे ऐश्वर्या हरिशंकर ?
Prajakta Mali Post: 'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Embed widget