एक्स्प्लोर

Prashant Damle On NEET Protest: 'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?

काही वेळा अर्धवट माहितीवरसुद्धा ते त्यांची गाडी ढकलतात. मला असं वाटतं की, 50 पैकी 40 लोक अर्धवट माहितीवर गाडी ढकलणाऱ्या असतात

Prashant Damle on NEET Protest: नीट पेपरफुटीवरून देशभरातील विद्यार्थी दिल्लीतील जंतरमंतर येथे काही दिवसांपूर्वी एकवटले होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी छेडलेल्या या आंदोलनानंतर देशातील शिक्षण व्यवस्थेवरून सरकार विरोधाचा सूर तिक्ष्ण झाला. या आंदोलनाच्या समर्थनार्थ देशभरातील 'जेन झी' तरुणाई रस्त्यावर उतरली. दरम्यान मनोरंजनसृष्टीतील अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला. तर अनेकांनी सरकारच्या बाजूचा मार्ग निवडला. सोशल मीडियावर अनेकांच्या पोस्ट व्हायरल झाल्या. दरम्यान, मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी' जर नीटचा फुल फॉर्म माहीत नसेल, तर आंदोलनात जाऊन उपयोग काय?' असा सवाल केला.  'माझा कट्ट्यावर ते बोलत होते. त्यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत असून अनेकजण त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत आहेत. 

आंदोलन सुरू होतं त्यावेळीही अभिनेते प्रशांत दामले यांनी व्हिडिओ करत या विषयावर आपलं मत व्यक्त केलं होतं. 'सरकारने हात पुढे केला आहे, आता तुम्हीही त्यांच्या हातात हात द्या' अशा आशयाचं ते बोलले होते. Abp माझाशी बोलताना, जेन झींचं आंदोलन, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या विषयावर ते बोलले आहेत.

काय म्हणाले प्रशांत दामले?

'हा योगायोग आहे.मी आवाहन केलं आणि त्यांनी राजीनामा दिला असं होत नाही , असं होऊही नये. तरुणांचे प्रश्न वेगळे असतात.त्यांची इच्छा वेगळी असते. त्यांचा ऐकून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या म्हणण्याला योग्य वेळी उत्तर देणे महत्त्वाचं आहे. हल्ली त्यांना सगळं झटपट पाहिजे. मी तुला सांगितलं आणि तू परत दोन दिवसांनी फोन करून सांगशील, असं त्यांना चालत नाही. तिथल्या तिथे त्यांना उत्तर पाहिजे. कारण ते आपल्यापेक्षा फास्ट आहेत. त्यांच्याकडे तशी साधनं आहेत. काही वेळा अर्धवट माहितीवरसुद्धा ते त्यांची गाडी ढकलतात. मला असं वाटतं की, 50 पैकी 40 लोक अर्धवट माहितीवर गाडी ढकलणाऱ्या असतात. दहाजण काम करणारे असतात, किंवा अभ्यासपूर्ण बोलणारे असतात. मला असं वाटतं की, 10 जण कोण आहेत, हे ओळखायला पाहिजे. फक्त सरकारच नाही, तर कुठल्याही क्षेत्रात. जे अभ्यास करून बोलतात, ते खरे असतात. त्यांची मतं काय आहेत, हे समजून घ्यायला पाहिजे.' असं अभिनेते प्रशांत दामले म्हणाले.

'नीटचा फुलफॉर्म माहित नसेल तर घोषणा देऊन काय उपयोग?'

ते पुढे म्हणाले 'आताच्या मुलांना खूप जास्त स्वातंत्र्य आहे. ते इतकं पण नको. स्वातंत्र्य म्हणण्याआधी मी त्यांच्यापेक्षा हुशार पाहिजे, तर मी हे म्हणू शकतो की, त्यांना स्वातंत्र्य नको. त्यांनी एखादा काउंटर केला तर त्यावर मला काउंटर करता आलं पाहिजे. 50 पैकी 10 मुलं अतिशय हुशार आहेत, पण 40 मुलं अर्धवट अभ्यास करणारे आहेत. तर अर्धवट अभ्यास करणाऱ्या मुलांबद्दल मी बोलतोय. ही जी अर्धवट अभ्यास करतात ना ..समजा नीटचा फुल फॉर्म काय हे जर आपल्याला माहित नसेल, तर नीट च्या घोषणा देऊन काय उपयोग? ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, यासाठी मी इथे आलोय, ती गोष्ट तुम्हाला करायची असेल, तर त्याची तुम्हाला पूर्ण माहिती असणं, त्यातले फायदे तोटे, येणारे अडथळे कळणं आवश्यक आहे.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

'मी 44 वर्षे इथे काम करतोय.इथे काय अडथळे येऊ शकतात याची मला माहिती आहे.1983 ते 2008 मध्ये मी फक्त कलाकार होतो.या संपूर्ण कालावधीत निर्मात्याला येणाऱ्या अडचणी काय असू शकतात हे मी शिकलो.अर्धवट माहितीच्या आधारे कोणावरही आरोप करणं चुकीचं आहे असं मला वाटतं' असं प्रशांत दामले म्हणाले.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
Prashant Damle On NEET Protest: 'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ! 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स, ब्रँड्सची मोठी यादी; कोण आहे ऐश्वर्या हरिशंकर ?
एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ! 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स, ब्रँड्सची मोठी यादी; कोण आहे ऐश्वर्या हरिशंकर ?
Prajakta Mali Post: 'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
Advertisement

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Prajakta Mali Post: 'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
Embed widget