एक्स्प्लोर

टोपी जेहच्या खोलीत पडली, सैफ अली खानच्या घरात फिंगरप्रिंटही आढळले; मोहम्मद शहजादविरोधात पोलिसांना बक्कळ पुरावे सापडले

Saif Ali Khan Attack: मुंबई पोलीस सैफ अली खानच्या घरातून सर्व पुरावे गोळा करत आहेत. अलिकडेच पोलिसांनी क्राईम सीनचं रिक्रीएशन केलं आहे. आता पोलिसांना अभिनेत्याच्या धाकट्या मुलाच्या खोलीतून आरोपीनं घातलेलं मास्क सापडलं आहे.

Saif Ali Khan Attack: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) घरात घुसून चोरट्यानं त्याच्यावर चाकूहल्ला केला. सैफच्या घरात घुसून त्याच्यावर करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड हादरलं. 16 जानेवारीला मध्यरात्री सैफवर हल्ला करण्यात आला. त्याच्यावर अनेकदा चाकूनं वार करण्यात आले. त्यानंतर त्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आणि त्याच्या मणक्याजवळून अडीच इंचाचा चाकूचा तुकडा काढला. तब्बल पाच दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर मंगळवारी (21 जानेवारी) सैफला डिस्चार्ज देण्यात आला. सैफच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, याप्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून सैफ अली खानच्या घराची झाडाझडती सुरू असून पोलीस पुरावे गोळा करत आहेत. या तपासादरम्यान, आरोपीनं सैफवर हल्ला केला त्यावळी चेहऱ्यावर लावलेलं मास्क पोलिसांना सैफचा लहान मुलगा जेहच्या खोलीत सापडलं होतं. 

सैफच्या घरात सापडलं आरोपीचं मास्क 

सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना सैफचा मुलगा जहांगीरच्या खोलीत आरोपी शहजादनं लावलेलं मास्क आढळलं. जेहच्या खोलीतच सैफ आणि आरोपीमध्ये झटापट झाली होती. पोलिसांनी मास्क आणि आरोपीचे केस डीएनए चाचणीसाठी स्कूल ऑफ फॉरेन्सिक मेडिसिनकडे पाठवले आहेत. पोलिसांनी पुरावा म्हणून सैफच्या घरातून आरोपीचे 19 बोटांचे ठसे सापडले आहेत.

पोलिसांकडून सैफच्या घरात क्राईम सीनचं रिक्रिएशन 

पोलिसांनी काल (मंगळवार, 21 जानेवारी) आरोपीला सैफ अली खानच्या घरी नेलं आणि क्राईम सीन्सचं रिक्रिएशन केलं. यावेळी आरोपी शहजादनं सांगितलं की, त्यानं इमारतीतील अनेक फ्लॅट्सच्या डक्ट तपासल्या, पण डक्ट सील केल्यामुळे आणि इतर फ्लॅट्सचे सर्व दरवाजे बंद असल्यानं तो दुसऱ्या कुणाच्याच घरात प्रवेश करू शकला नाही. यावेळी त्याला संपूर्ण इमारतीत फक्त सैफ अली खानच्याच घराता मागचा दरवाजा उघडा असल्याचं आढळलं. आरोपीनं सांगितलं की, तो सैफ अली खानच्या घरात घुसला आहे, हे त्याला माहीत नव्हतं. सकाळी बातम्या पाहिल्यानंतर त्याला कळालं की, तो प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानच्या घरात शिरला आहे. यादरम्यान, इमारतीच्या मुख्य दरवाजाचे सीसीटीव्ही बंद असल्याचंही उघड झालं. पण काही फ्लॅट्सचे खाजगी सीसीटीव्ही काम करत होते. त्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी स्पॉट झाला. 

सैफच्या घराची सुरक्षा वाढवली

सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिनेत्याच्या घराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. त्याच्या घरात अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सध्या वायरिंगचं काम सुरू आहे. यासोबतच एसी डक्ट बंद करण्याचं कामही सुरू आहे. सैफ घरी पोहोचताच त्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची पावलं उचललीत. सैफनं त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी अभिनेता रोनित रॉयच्या सुरक्षा एजन्सीकडे सोपवली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Riteish Deshmukh On Marathi Film Industry: 'महाराष्ट्रातच मराठीला दुसरं स्थान...'; रितेश देशमुखनं बोलून दाखवली खंत, विलासरावांची इच्छा सांगताना म्हणाला...
'महाराष्ट्रातच मराठीला दुसरं स्थान...'; रितेश देशमुखनं बोलून दाखवली खंत, विलासरावांची इच्छा सांगताना म्हणाला...
Siddharth Jadhav Marathi Play Animal: सिद्धार्थ जाधवचं आठ वर्षांनी रंगमंचावर दणक्यात पुनरागमन; 'ॲनिमल'मध्ये साकारणार दुहेरी भूमिका
सिद्धार्थ जाधवचं आठ वर्षांनी रंगमंचावर दणक्यात पुनरागमन; 'ॲनिमल'मध्ये साकारणार दुहेरी भूमिका
Thalapathy Vijay Trisha Krishnan Wedding Rumors: पत्नीनं जिच्यासोबत विवाहबाह्य संबंधांचे आरोप केले, त्याच अभिनेत्रीसोबत लग्नगाठ बांधणार सुपरस्टार थलपती विजय?
पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर थलपती विजय तृषा कृष्णननसोबत लग्नगाठ बांधणार? अभिनेत्रीच्या आईनं केलेल्या कृतीमुळे चर्चांना उधाण
Dhurandhar 2 Vivek Sinha Reacts On Getting Hate: 'हिंदू बहुत डरपोक कौम है…', 'धुरंधर 2'च्या डायलॉगवर भडकले प्रेक्षक, अभिनेत्याला जीवेमारण्याच्या धमक्या; जीव तोडून सांगतोय, 'अरे मी हिंदू...'
'हिंदू बहुत डरपोक कौम है…', 'धुरंधर 2'च्या डायलॉगवर भडकले प्रेक्षक, अभिनेत्याला जीवेमारण्याच्या धमक्या; जीव तोडून सांगतोय, 'अरे मी हिंदू...'

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Embed widget