एक्स्प्लोर

Bollywood Actor Struggle Life: सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार

Bollywood Actor Struggle Life: रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेतील भगवान हनुमानाच्या भूमिकेसाठी दारा सिंह यांची प्रचंड प्रशंसा झाली. मालिकेनंतर ते जिथे जिथे गेले, तिथे लोकांनी त्यांना त्या दैवी व्यक्तिरेखेच्या नजरेतूनच पाहिले.

Bollywood Actor Struggle Life: 1987 हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी (Entertainment World) अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. याच वर्षी दूरदर्शनवर एक मालिका सुरू झाली, जिनं रस्ते आणि वस्त्या ओस पडल्यासारखी स्थिती निर्माण केलेली. कारण ही मालिका सुरू झाली की, लोक टीव्हीसमोरच जाऊन बसायचे आणि जोपर्यंत मालिका संपत नाही, तोपर्यंत तिथून हलायचे नाहीत. आम्ही ज्या टीव्ही मालिकेबाबत बोलतोय ती मालिका म्हणजे, रामानंद सागर यांची 'रामायण' (Ramayana). त्या काळात या मालिकेनं सर्वांनाच भुरळ घातलेली आणि त्यानंतर या मालिकेतील कलाकारांना अक्षरशः देवतुल्य मानलं जाऊ लागलं. या कलाकारांमध्ये बॉलिवूडचे अभिनेते (Bollywood Actor) दारा सिंह (Dara Singh) यांचाही समावेश होता, ज्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकलीत. पडद्यावर त्यांनी आध्यात्मिक व्यक्तिरेखांपासून ते प्रत्यक्ष आयुष्यातील नायकांपर्यंत विविध भूमिका साकारल्या. 

रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या 'रामायण' मालिकेतील (Ramayana TV Serial) भगवान हनुमानाच्या (Bhagwan Hanuman) भूमिकेसाठी दारा सिंह यांची प्रचंड प्रशंसा झाली. या मालिकेनंतर ते जिथे जिथे गेले, तिथे लोकांनी त्यांना त्या दैवी व्यक्तिरेखेच्या नजरेतूनच पाहिले. जरी दारा सिंह आज आपल्यात नसले, तरी त्यांचे पुत्र विंदू दारा सिंह यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिलाय. विंदू दारा सिंह यांनी एनडीटीव्हीशी (NDTV) बोलताना त्यांच्याबद्दलचे काही किस्से सांगितलेत.

अभिनेत्याची शेवटची इच्छा (Bollywood Actor Dara Singh Struggle Life)

विंदू दारा सिंह म्हणाले की, "त्यांचे चाहते आजही रोज म्हटलं तरी त्यांची आठवण काढतात. त्यांचा वाढदिवस असो किंवा पुण्यतिथी, दारा सिंह लोकांच्या हृदयात सदैव जिवंत आहेत. आजही लोक सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ क्लिप्स शेअर करतात. अशी माणसं कधीच आपल्याला सोडून जात नाहीत, ती अजरामर होतात. मी जिथे जिथे जातो, तिथे मला जाणवतं की, ते संपूर्ण भारतातील लोकांच्या हृदयात वसलेले आहेत. लोक त्यांच्याबद्दल आणि 'रामायण'मधील भगवान बजरंगबलीच्या भूमिकेबद्दल आवर्जून बोलतात. त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांसोबत आहेत."

विंदू दारा सिंह पुढे बोलताना म्हणाले की, "जेव्हा त्यांची प्रकृती खूपच खालावली, तेव्हा मी त्यांना विचारलं की, त्यांच्या काही इच्छा आहेत का? त्यांना काय करायचंय किंवा त्यांच्या मनात काही अपूर्ण इच्छा राहिली आहे का? सुरुवातीला ते म्हणाले की, आता त्यांची कोणतीही इच्छा उरलेली नाही. पण जेव्हा मी आग्रह धरून विचारलं की, एखादी तरी इच्छा असेलच ना, तेव्हा ते म्हणाले, "टीव्हीवर फक्त 'रामायण' लावून दे..." त्यानंतर त्यांनी पुढील 15 दिवसांत संपूर्ण 'रामायण' मालिका पाहिली. त्यानंतर काही काळातच त्यांचं निधन झालं..."

Bollywood Actor Struggle Life: सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार

बालपणीच्या आठवणींना उजाळा 

बिंदू दारा सिंह पुढे म्हणाले की, "बालपणीच्या आठवणी खरोखरंच खूप मौल्यवान असतात. माझ्या वडिलांसोबतच्या अशा अनेक आठवणी माझ्याकडे आहेत, जसं की त्यांच्या सिनेमांच्या शूटिंगला जाणं. शुटिंगदरम्यान जेव्हा ते सिंहांशी लढत असत, तेव्हा त्यांच्या संपूर्ण शरीरावर जखमांच्या खुणा उमटायच्या. त्याशिवाय, जेव्हा ते कुस्तीचे सामने आयोजित करत, तेव्हा अजय देवगण, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांसारखे मोठे अभिनेते ते पाहण्यासाठी येत असत. सरदार वल्लभभाई स्टेडियमची आसनक्षमता 50,000 होती, स्टेडियम पूर्ण भरलेलं असायचं आणि बाहेरही 25,000 लोक उभे असायचे. माझ्या वडिलांना जनतेचं प्रचंड प्रेम मिळालं. व्यायाम कसा करावा आणि आयुष्यात शांत कसं राहावं, हे देखील मी त्यांच्याकडूनच शिकलो. त्यांच्यासारखी माणसं आयुष्यात एकदाच येतात, ती पुन्हा पुन्हा येत नाहीत..."

दरम्यान, बिंदू दारा सिंह अलीकडेच 'वेलकम टू द जंगल' सिनेमात झळकले आहेत. या सिनेमात त्यांनी अशा एका पात्राची भूमिका साकारली आहे, ज्यामध्ये विनोदासोबतच काहीसे 'ग्रे शेड्स' देखील पाहायला मिळतात. यापूर्वी ते 'सन ऑफ सरदार 2' मध्ये दिसले होते. तो आधीचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा प्रभाव पाडू शकला नाही, मात्र 'वेलकम टू द जंगल'नं प्रचंड यश मिळवलंय. या सिनेमात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि रवीना टंडन यांसारखे बडे कलाकार आहेत. तरीही, या दिग्गज कलाकारांच्या गर्दीतही बिंदू दारा सिंह यांनी आपली वेगळी छाप पाडण्यात यश मिळवलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bollywood Actor Struggle Life: बॉलिवूडचा 'किंग ऑफ रोमांस', सलमान-शाहरुखपेक्षाही खतरनाक स्वॅग, परवानगीशिवाय रेखाला केलेलं किस, अख्खी इंडस्ट्री हादरलेली

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget