एक्स्प्लोर

Sonali Phogat Death : सोनाली फोगाट हत्याप्रकरणाला नवं वळण; 'जबरदस्तीनं ड्रग्ज देण्यात आलं होतं', पोलिसांची माहिती

सोनाली (Sonali Phogat Death Case) यांच्या शवविच्छेदनातच्या अहवालामध्ये आता असं म्हटलं गेलं आहे की, त्यांना जबरदस्तीनं ड्रग्स देण्यात आलं होतं.

Sonali Phogat Death : भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat Death Case) यांच्या हत्याप्रकरणाला आता नवं वळण मिळालंय. सोनाली यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात होती. आता सोनाली यांच्या शवविच्छेदनातच्या अहवालामध्ये आता असं म्हटलं गेलं आहे की, त्यांना जबरदस्तीनं ड्रग्स देण्यात आलं होतं. सोनाली फोगाट यांच्या हत्येप्रकरणी गोवा पोलिसांनी फोगाट यांचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी या दोघांना अटक केली आहे. मंगळवारी (23 ऑगस्ट)  सोनाली यांचा मृतदेह  गोव्यामध्ये अढळला  होता.  

गोवा पोलीस महासंचालक ओमवीर सिंह बिश्नोई यांनी सांगितले की, 'आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. त्यामध्ये सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी हे सोनाली यांच्यासोबत पार्टी करताना दिसत आहेत. सोनाली यांना  जबरदस्तीने अंमली पदार्थ देण्यात आले होते. सोनालीला द्रव स्वरूपात ड्रग्ज देण्यात आल्याची कबुली सुखविंदरने दिली आहे. सुखविंदर आणि सुधीर सांगवान  हे सोनाली फोगट यांच्यासोबत टॉयलेटमध्ये गेले होते, ते तिथे 2 तास थांबले. तिथे काय झाले? याची चौकशी केली असता सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. आम्ही सध्या चौकशी करत आहोत जेणेकरून आम्हाला अधिक माहिती मिळेल.'  

काय म्हणाले पोलीस?  

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की,'सोनाली यांच्या कुटुंबातील व्यक्ती जे आरोप करत आहेत, त्याचे पुरावे सध्या मिळत नाहीयेत. काही लोक मुंबईमधून सोनाली यांना भेटण्यासाठी जाणार होते. कोणतीही विशिष्ट दुखापत नव्हती, त्यामुळे डॉक्टरांनी आधी मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले होते. पार्टीत अनेक लोक आल्याचे सीसीटीव्हीत दिसत होते. कोणते ड्रग्स दिली गेली हे अद्याप कळू शकलेले नाही.  ड्रग्सची बाटली कुठे फेकली या संदर्भात तपास सुरू आहे.' 

सोनाली यांना एका टॅक्सी चालकाने क्लबमधून हॉटेलमध्ये नेल्याचे, पोलिसांनी सांगितले. त्यावेळी सोनाली फोगट कोणत्या अवस्थेत होत्या? याची माहिती मिळवण्यासाठी  गोवा पोलीस टॅक्सी चालकाची चौकशी करत आहेत. 

टिकटॉक स्टार राहिलेल्या सोनाली यांना भाजपकडून हिसारमधून उमेदवारी देण्यात आली होती. रियॅलिटी शो 'बिग बॉस'मुळेही (Big Boss) सोनाली फोगाट चर्चेत आल्या होत्या. उत्तर गोव्यातील अंजुना येथील रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकानं त्यांना 23 ऑगस्ट रोजी मृत घोषित केलं होतं.  

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
Embed widget