Bollywood Movie : वरुण धवनच्या पुतणीचं बॉलीवूडमध्ये पदार्पण, 'बिन्नी अँड फॅमिली' चे फर्स्ट लूक पोस्टर आउट !
Bollywood Movie : एकता कपूर आणि महावीर जैन यांचा 'बिन्नी अँड फॅमिली' या सिनेमाचे फर्स्ट लूक पोस्टर नुकतच लॉन्च करण्यात आले आहे.
Bollywood Movie : एकता कपूरची निर्मिती असणारा 'बिन्नी अँड फॅमिली' (Binni and Family) या सिनेमाचं पोस्टर नुकतच लॉन्च करण्यात आलं आहे. येत्या 30 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिन्नी अँड फॅमिली’ ही प्रत्येक पिढीसाठी एक संदेश देणारी गोष्ट आहे. पहिले पोस्टर हे खूप कमालीचं असून आता चित्रपटात काय बघायला मिळणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. याच सिनेमातून वरुण धवनची (Varun Dhawan) पुतणी अंजिनी धवन ही बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.
या सिनेमात अंजिनी धवन आणि नमन त्रिपाठी हे कलाकार दिसणार आहेत. त्याचप्रमाणे या दोघांचं हे बॉलीवूड पदार्पण असून हे फ्रेश चेहरे इंडस्ट्रीत नवी ऊर्जा निर्माण करून प्रेक्षकांचं मनोरंजन करतील यात शंका नाही.या चित्रपटात पंकज कपूर, राजेश कुमार, हिमानी शिवपुरी आणि चारू शंकर यांच्याही भूमिका आहेत.
चित्रपट कुटुंबांना एकत्र आणेल - निर्माते
सिनेमाच्या निर्मात्यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "आजच्या काळात आणि गडद चित्रपटांना अधिक महत्त्व प्राप्त होत असताना आम्ही एक संपूर्ण कौटुंबिक चित्रपट घेऊन येत आहोत जो तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासमवेत कोणत्याही बघू शकता. हा चित्रपट प्रत्येक पिढीशी संवाद साधणारा आहे मग तो तरुण असो, किशोरवयीन असो, मध्यमवयीन असो किंवा वृद्ध असो, हा चित्रपट कुटुंबांना एकत्र आणेल आणि तो पाहण्यासाठी मी आमच्या प्रेक्षकांची प्रतीक्षा करू शकत नाही."
हा चित्रपट 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून त्यात #HarGenerationKuchKehtaHai असा संदेश देण्यात आला आहे. तुम्ही कोणत्या पिढीचे आहात हे महत्त्वाचे नाही, ‘बिन्नी अँड फॅमिली’ तुमच्यासाठी आपल्या सर्वांना जोडणारी कथा घेऊन येणार आहे.
View this post on Instagram