एक्स्प्लोर

2024 चा सर्वात मोठा खिलाडी; ज्यानं ठोकला ब्लॉकबस्टर फिल्म्सचा सिक्सर, ना हा शाहरुख खान, ना अल्लू अर्जुन... मग कोण?

Biggest Actor Of 2024: 2024 चा हा स्टार आहे, ज्यानं बॉक्स ऑफिसवर असा विक्रम केला आहे, जो मोठ्या नावांच्याही पलिकडे आहे. या अभिनेत्याचं सहा चित्रपट प्रदर्शित झाले आणि सर्व हिट ठरले. हा शाहरुख खान किंवा अल्लू अर्जुन नाही.

Biggest Actor Of 2024: 2024 मध्ये, जिथे अक्षय कुमार (Akshay Kumar), अजय देवगण (Ajay Devgan), रजनीकांत (Rajnikanth) आणि महेश बाबू (Mahesh Babu) म्हणजेच, बॉलिवूडपासून साऊथपर्यंतचे स्टार्स बॉक्स ऑफिसवर (Box Office Hit) हिट चित्रपटांसाठी आसुसलेले आहेत. 34 वर्षांच्या अभिनेत्याचे सहा चित्रपट प्रदर्शित झाले आणि सर्व ब्लॉकबस्टर ठरले. चित्रपटातील कॅमिओ असो लीड रोल, या स्टारनं दाखवून दिलं की, जर तुम्हाला अभिनयाची जाण असेल, कथा निवडण्याची समज असेल आणि जास्त थाटामाटात, दिखाऊपणावर विश्वास नसेल, तर बॉक्स ऑफिसवर लोक आपोआप पैशांचा वर्षाव करतील.  

हा अभिनेता दुसरा, तिसरा कोणी नसून दिग्दर्शक आहे, ज्यानं 2021 मध्ये 'मिनल मुरली' बनवली आणि कमी बजेटमध्येही एक उत्तम सुपरहिरो चित्रपट बनवता येतो हे दाखवून दिले. सर्वांना मागे टाकणाऱ्याचं नाव आहे, बासिल जोसेफ (Basil Joseph). एक उत्तम दिग्दर्शक असण्यासोबतच, बेसिल एक अनुभवी अभिनेता देखील आहे. 2024 मध्ये बेसिलचे सहा चित्रपट प्रदर्शित झाले आणि ते सर्वच्या सर्व यशस्वी ठरले. बासिलचा नुकताच प्रदर्शित झालेला 'सुक्षमा दर्शनी' हा चित्रपट केवळ 11 दिवसांपूर्वीच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला, पण त्याचं बजेट 10 कोटी रुपये असताना त्यानं 40 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

2024 मध्येच, प्रणव मोहनलालच्या 'वर्षांगलकू शेषम'मध्येही बेसिल होता आणि या 10 कोटी रुपयांच्या चित्रपटानं तब्बल 80 कोटी रुपयांची कमाई केली. तो पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत गुरुवायूर अंबालनदयीलमध्ये दिसला होता. 15 कोटींच्या या चित्रपटानं 90 कोटींची कमाई केली. बेसिलच्या नानक्कुईनं 8 कोटी रुपयांच्या बजेटसह 23 कोटी रुपये जमा केले. बेसिल टोविनो थॉमसच्या आर्मीमध्ये देखील होता. 30 कोटींच्या या चित्रपटानं 106 कोटींची कमाई केली. तर वादा या चित्रपटात त्याचा कॅमिओ होता. 4 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटानं 40 कोटींची कमाईही केली. अशाप्रकारे त्यांचं 2024 चं रिपोर्ट कार्ड 100 टक्के झालं आहे. त्याच्यावर एकूण 87 कोटी रुपये लागले आणि त्याच्या चित्रपटांनी 381 कोटी रुपयांची कमाई केली.

बासिल जोसेफ यांनं त्याच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये एक शॉर्ट फिल्म बनवून त्यांची प्रतिभा दाखवली होती. त्यांनी मल्याळम चित्रपट उद्योगात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली. 2015 मध्ये त्यांनी दिग्दर्शक म्हणून कुंजीरामायणम बनवला आणि तो सर्वांना आवडला. त्यानंतर त्यांनी आणखी दोन चित्रपट दिग्दर्शित केले आणि तेही सर्वांना आवडले. त्यांनी 2013 मध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केलं. पण बासिल जोसेफची वर्किंग स्टाईल आणि अभिनयाचे धडे साऱ्याच बड्या स्टार्सनी घ्यायला हवे, कथेचा आणि अभिनयाचा मसाल्याशिवाय बिग बजेट आणि मोठ्या सेटही निरुपयोगी ठरतात.

View this post on Instagram
 
A post shared by Basil ⚡Joseph (@ibasiljoseph)

बासिल जोसफच्या 2024 च्या सुपरहिट फिल्म्स :

1. वर्षांगल्क्कु शेषम (Varshangalkku Shesham)

डायरेक्टर: विनीत श्रीनिवासन
बजेट: 10 कोटी रुपये
बॉक्स ऑफिस कलेक्शन: 79 कोटी रुपये

या फिल्म्समध्ये बासिल जोसफनं महत्त्वाची भूमिका साकारली असून बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटानं न केवळ प्रेक्षकांना आकर्षित केलं, तर बक्कळ कमाईही केली.

2. गुरुवायूर अंबलानदायिल (Guruvayoor Ambalanadayil)

डायरेक्टर: विपिन दास
बजेट: 15 कोटी रुपये
बॉक्स ऑफिस कलेक्शन: 90 कोटी रुपये

पृथ्वीराज सुकुमारन आणि बासिल जोसफची ट्यूनिंग या चित्रपटात लोकांना फार आवडली. 

3. ननक्कुई (Nunakkuzhi)

डायरेटर: जीतू जोसेफ
बजेट: 8 कोटी रुपये
बॉक्स ऑफिस कलेक्शन: 23 कोटी रुपये

यामध्ये बेसिल जोसफ, ग्रेस एंटनी, निखिला वर्मा आणि सिद्दीकी लीड रोलमध्ये आहेत. 

4. वाडा (Vaazha)

डायरेटर: आनंद मेनन
बजेट: 4 कोटी रुपये
बॉक्स ऑफिस कलेक्शन: 40 कोटी रुपये

फिल्ममध्ये सिजू सननी, अमित मोहन राजेश्वरी, जोमॉन ज्योतिर आणि अनुराज लीड रोलमध्ये आहेत. 

5. ए.आर.एम (ARM)

डायरेटर: जितिन लाल
बजेट: 30 कोटी रुपये
बॉक्स ऑफिस कलेक्शन: 100-106 कोटी रुपये

ही फिल्म बासिल जोसफच्या करियरची सर्वात मोठी हिट फिल्म ठरली. एआरएममध्ये बेसिलच्या अल्वा टोविनो थॉमस, सुरभि लक्ष्मी, कृति शेट्टी आणि ऐश्वर्या राजेश दिसून आले होते.

6. सूक्ष्मदर्शिनी (Sookshma Darshini)

डायरेटर: एम.सी. जितिन
बजेट: 10 कोटी रुपये
बॉक्स ऑफिस कलेक्शन: 43 कोटी रुपये

या फिल्ममध्ये बासिल जोसफ आणि नाजरिया नाजिमच्या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. फिल्ममध्ये बासिलसोबत नजरिया नजीम दिसून आलेली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
Embed widget