'आम्ही काय इथे हात लावायला आलोय का?' अनुश्रीच्या विचित्र आरोपानंतर सागरनं चांगलीच खरडपट्टी काढली, रुचिताने घातला वितंड वाद
अनुश्रीच्या विचित्र आरोपांवर सागर कारंडेने अनुश्रीचं सगळंच बोलणं बाहेर काढलं. अनुश्रीने केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत सागरने राकेशची बाजू घेतल्याचे दिसलं.

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रेक्षकांना सीजन सुरू झाल्यापासून स्पर्धकांमध्ये वादविवाद पाहायला मिळत आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात काल अनुश्री आणि राकेश बापट या दोघांमध्ये बेडवरून वाद झाला. अनुश्री राकेशच्या बेडवर झोपली होती. राकेशची प्रकृती बरी नसल्याने डॉक्टरांनी त्याला औषधही पाठवली होती. राकेशने आधी 'प्लीज माझ्या जागेवरून उठ आणि दुसरीकडे झोप' अशी विनंती अनुश्रीला केली होती. अनेकदा समजावूनही अनुश्रीने त्याचा ऐकलं नाही. घरातील सदस्यांनाही त्याने विनंती केली की 'तिला माझ्या जागेवरून उठवा.'शेवटी कंटाळलेल्या राकेशने तिचा हात धरून तिला उठवलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 'राकेशने हात लावून आपल्याला खेचलं' असं म्हणत तिने कांगावा केला. यावरून बिग बॉसच्या घरात मोठा वितंड वाद सुरू झाला होता. या वादानंतर कलर्स मराठीने घरातील एक प्रोमो शेअर केला आहे. यात अनुश्रीच्या विचित्र आरोपांवर सागर कारंडेने अनुश्रीचं सगळंच बोलणं बाहेर काढलं. अनुश्रीने केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत सागरने राकेशची बाजू घेतल्याचे दिसलं.
काय म्हणाला सागर कारंडे ?
अनुश्रीच्या आरोपांवर सागर प्रचंड चिडलेला दिसला. त्याने अनुश्रीला आणि रुचिता जामदारला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी सागर म्हणाला,' त्यावेळीच तू जर सांगितलं असतं की मला हात लावलेला चालणार नाही. तर त्यानेही मान्य केलं असतं की नाही लावणार बाई. थँक्यू मला सांगितल्याबद्दल. संपतो मुद्दा . आता माझ्याही डोक्यात आलंय रे तुमच्याशी बोलताना पण मला भीती वाटायला लागली आहे आता.' यावर अनुश्री 'मी त्याच्याशी बोलायला जाऊ का?' असं विचारते तेव्हा विशाल तिला 'आता जेवढं बोलायला जाशील तेवढा तो वरचढ दिसेल आणि तू चुकीची दिसशील' असं त्याने तिला सांगितलं.
View this post on Instagram
सागरने अनुश्रीला समजावून सांगताना म्हटलं, 'कुठल्याही माणसाला इव्हन तू मलाही म्हणाली असतीस तरी मला वाईट वाटलं असतं. आम्ही तुम्हाला बहिणीसारखा मानतो यार .आणि तुम्ही म्हणता हात लावायचा नाही.आम्ही इथे हात लावायला आलो काय? इथे कोणालाही कॅरेक्टरवर जायची गरजच नाहीये. इथे प्रत्येक जण गेम खेळायला आला आहे. हा मुद्दा नाहीये. हा मुद्दा काढण्याची गरजही नाही. जर तुम्हाला वाईट वाटत होतं तर त्याच वेळेस बोलायला पाहिजे होतं तुम्ही. यापुढे जरा लक्षात ठेवा. हे घडवून दिवस जातो तास लोटतात तेव्हा तुम्ही बोलता. आता विषय वेगळा चाललाय. इथून तिथे विषय कसा जातो.'
View this post on Instagram
रुचिताने वाद वाढवला
सागरच्या या बोलण्यावर रुचिता जामदार पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह झालेली दिसली. 'मी कोणाच्याही कॅरेक्टर वर गेलेली नाही. मुद्दा कॅरेक्टरचा नाही परमिशनचा आहे. कुठलीही मुलगी असली असती तरी मी हेच बोलले असते. राकेशचा एक्सपिरीयन्स अनेक वर्षांचा आहे. त्यामुळे बिग बॉस मलाच बोलणार. कारण मी नवखी आहे . पण किती जरी वेळा मला रितेश भाऊ जरी बोलले तरी मी हेच बोलन की माझा इंटेंशन ते नव्हतं म्हणजे नव्हतं. अगदी भाऊ बोलले तरी. अख्ख घर माझ्या विरुद्ध असलं तरी .' असं म्हणत रुचिताने वाद वाढवल्याच दिसलं.























