एक्स्प्लोर

अंगावर धावून गेले, हातापायी झाली, गळा दाबला? बिग बॉसच्या घरात पहिल्या कॅप्टन्सीसाठी तुफान राडा, व्हिडिओ समोर

नॉमिनेशन टास्कदरम्यान बिग बॉसने अनपेक्षित वळण देत खेळाचं गणित बदललं. पॉवर की असतानाही शॉर्टकट दरवाजाने घरात आलेले तीन सदस्य थेट नॉमिनेट झाले

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाच्या पहिल्या आठवड्यात आता घरात खेळाला वेग येताना दिसतोय. बुधवारी झालेल्या नॉमिनेशन टास्कनंतर गुरुवारच्या भागात (15 जानेवारी ) पहिल्या कॅप्टनसाठी रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्कचं नाव आहे ‘बीबी फार्म- कॅप्टनपदासाठी समर्थकांची झुंज’. ही झूंज स्पर्धकांनी खरंच मनावर घेतल्याचं दिसतंय. या टास्कदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आलाय. यात दोन स्पर्धकांमध्ये जोरदार राडा झाल्याचं दिसतंय. कलर्स मराठीने आपल्या सोशल मीडियावर या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर केलाय. (Bigg Boss Captancy Task)

बिगबॉसनं गेम फिरवला, कॅप्टन्सीसाठी घरात टास्क

नॉमिनेशन टास्कदरम्यान बिग बॉसने अनपेक्षित वळण देत खेळाचं गणित बदललं. पॉवर की असतानाही शॉर्टकट दरवाजाने घरात आलेले तीन सदस्य थेट नॉमिनेट झाले, तर तन्वी, सोनाली आणि प्राजक्ता या तिघी पहिल्या कॅप्टनपदाच्या शर्यतीत उतरल्या. आता या तिघींपैकी कोणाच्या गळ्यात कॅप्टनची माळ पडणार, हे ठरवण्यासाठी ‘बीबी फार्म’ हा टास्क खेळवला जाणार आहे.

या टास्कची खास बाब म्हणजे कॅप्टनपदाच्या दावेदार स्वतः खेळणार नाहीत, तर घरातील इतर सदस्य त्यांच्या समर्थकांच्या भूमिकेत उतरून फार्ममधील वस्तू गोळा करताना दिसतील. ज्या स्पर्धकाला जितका जास्त पाठिंबा, तितकी तिची कॅप्टन होण्याची शक्यता वाढणार आहे.

काय आहे प्रोमोत ?

दरम्यान, या टास्कचा पहिला प्रोमो समोर आला असून त्यात वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. विशाल कोटियन आणि ओमकार राऊत यांच्यात तुफान राडा झाल्याचं दिसतंय. विशाल आणि ओंकार या टास्क दरम्यान एकमेकांना भिडल्याचे दिसत आहे. त्या दोघांमध्ये जोरदार बाचाबाची तर झालीच पण वस्तू हिसकावण्यावरून दोघांमध्ये झटापट होते आणि परिस्थिती इतकी बिघडते की ओमकार जोरात प्रतिकार करताना दिसतोय. विशाल आणि ओमकार एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एकाने गळा लॉक केला.झटापट झाली. पहिल्या कॅप्टनसाठीचा हा संघर्ष नेमका कोणाच्या बाजूने झुकणार, आणि घरात पुढील समीकरणं कशी बदलणार, हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे. मात्र या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख विशाल आणि ओमकार ची कान उघडणे करणार हे निश्चित अशी चर्चा रंगली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

महत्त्वाच्या बातम्या

Famour Marathi Poet Death: गायीला वाचवण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; मुंबई-गोवा महामार्गावर ज्येष्ठ कवयित्रीचा अपघाती मृत्यू, चारचाकीचा चक्काचूर
गायीला वाचवण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; मुंबई-गोवा महामार्गावर ज्येष्ठ कवयित्रीचा अपघाती मृत्यू, चारचाकीचा चक्काचूर
Golmaal 5 Distribution Rights : प्रदर्शनापूर्वीच 'गोलमाल 5' कमावणार तब्बल 100 कोटी; अजय देवगण-अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या हक्कांसाठी बड्या कंपन्यांमध्ये चुरस; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
प्रदर्शनापूर्वीच 'गोलमाल 5' कमावणार तब्बल 100 कोटी; अजय देवगण-अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या हक्कांसाठी बड्या कंपन्यांमध्ये चुरस; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Eetha Film New Song: श्रद्धा कपूरची दिलखेचक अदा अन् प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झलक; 'ईठा'मधील पहिलं गाणं रिलीज
श्रद्धा कपूरची दिलखेचक अदा अन् प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची झलक; 'ईठा'मधील पहिलं गाणं रिलीज
Avinash Narkar fathers death: 'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग
'समोर वडिलांचं पार्थिव अन् बाजूला आई..'; वडिलांच्या निधनानंतर अविनाश नारकर खचले, सांगितला भावूक प्रसंग

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MS Dhoni Emotional Video After Retirement Of IPL: IPL मधून निवृत्ती घेताच जून्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL मधून निवृत्ती घेताच जून्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL Top Released Player List 2027: MS धोनीपासून ट्रॅव्हिस हेड, शिमरॉन हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
धोनीपासून हेड, हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Maharashtra Live blog updates: कांदिवलीत 15 वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील 27 बांधकामे तोडली
Maharashtra Live blog updates: कांदिवलीत 15 वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील 27 बांधकामे तोडली
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
Adani Energy Satara Tarali Project: वनविभागाने तारळी प्रकल्पाचे काम थांबवले, अदानी एनर्जीचे अधिकारी थेट मंत्रालयात पोहोचले, गणेश नाईकांसोबत तातडीची बैठक, जलविद्युत प्रकल्पाबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण
वनविभागाने तारळी प्रकल्पाचे काम थांबवले, अदानी एनर्जीचे अधिकारी थेट मंत्रालयात पोहोचले, गणेश नाईकांसोबत तातडीची बैठक, जलविद्युत प्रकल्पाबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
Embed widget