Star Pravah Serial : स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; मयुरी वाघचीही लक्षवेधी भूमिका
Star Pravah Serial Aboli : स्टार प्रवाहच्या अबोली मालिकेत दोन नायिकांची होणार धमाकेदार एन्ट्री, जान्हवी किल्लेकर आणि मयुरी वाघ दिसणार लक्षवेधी भूमिकेत.
Star Pravah Marathi Serial Aboli : स्टार प्रवाहवरील (Star Pravah) अबोली मालिकेचं (Aboli Serial) कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. लवकरच कथानकातलं गूढ आणखी वाढणार आहे, कारण मालिकेत एन्ट्री होतेय इन्सपेक्टर दिपशिखा भोसले आणि शिवांगी देशमाने यांची. अभिनेत्री जान्हवी किल्लेकर इन्सपेक्टर दिपशिखाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि अभिनेत्री मयुरी वाघ शिवांगी देशमानेची भूमिका साकारणार आहे.
जान्हवी किल्लेकर साकारत असलेल्या दिपशिखा या पात्राला तिच्या वर्दीचा प्रचंड माज आहे. समोरच्या व्यक्तीला कमी लेखण्याची वृत्ती, विरोधकांना चिरडून टाकण्याचं कसब आणि तिची चौकस बुद्धी यामुळे तिची गुन्हेगारांमध्येच नव्हे तर संपूर्ण पोलीस क्षेत्रात चांगलीच दहशत आहे. लाच घेणं किंवा एखादं बेकायदेशीर काम करणं यात तिला काही गैर वाटत नाही. जर खाकी घालून मी कायद्याचं रक्षण करत असेन तर या खाकीचा फायदा मला झालाच पाहिजे…! हे तिचं आयुष्याचं तत्व आहे. तिच्या कर्तबगारपणामुळेच तिच्या वाईट गोष्टी कधीच लोकांसमोर आल्या नाहीत. तिनं केलेली बेकायदेशीर कामं देखील, ती खूप सराईतपणे लपवते. अशा या डॅशिंग दिपशिखा भोसलेपाटीलचा एका केसच्या संदर्भात आता अबोलीसोबत सामना होणार आहे.
View this post on Instagram
दिपशिखा प्रमाणेच मयुरी वाघ साकारत असेली शिवांगी बीडमधून मुंबईला आपल्या बहिणीच्या शोधात आली आहे. तिची बहीण समृद्धी लग्नासाठी मुंबईला आली असताना अचानक गायब झाली आणि तिच्याच शोधासाठी शिवांगी धडपड करतेय. समृद्धीचा खून झाला असेल, असं लोक म्हणत असले तरी त्यावर शिवांगीचा विश्वास नाहीये. साधी- सरळ,हतबल आणि परिस्थितीनं पिचलेल्या शिवांगीला अबोली आधार देते. शिवांगीच्या बहिणीच्या शोधात तिची भेट अबोली प्रमाणेच इन्सपेक्टर दिपशिखासोबतसुद्धा होते. त्यामुळे या केसला नवं वळण मिळणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :