Bigg Boss 16 Grand Finale : शिव ठाकरे आणि प्रियांकाचा ग्रॅंड फिनालेसाठी जबरदस्त परफॉर्मन्स; दोघांमध्ये चुरशीची लढत
Bigg Boss 16 Grand Finale Promo : रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' चा फिनाले आज होणार आहे. पुन्हा एकदा शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरी समोरासमोर उभे राहणार आहेत.
Bigg Boss 16 Grand Finale Promo : हिंदी रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) चा आज महाअंतिम सोहळा (Grand Finale) रंगणार आहे. बिग बॉसचा हा शो फारच रंजक होता. या शोमध्ये प्रत्येक स्पर्धकामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. काही स्पर्धक त्यांच्यातील मैत्रीने तर काही भांडणांमुळे कायम चर्चेत राहिले. बिग बॉसच्या घरात शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) यांच्यात कायम वाद पाहायला मिळाले. आज महाअंतिम सोहळ्यात हेच दोन स्पर्धक पुन्हा एकदा आमनेसामने दिसणार आहेत. त्याचा व्हिडीओही समोर आला आहे.
शिव-प्रियांका यांचा डान्स
View this post on Instagram
'बिग बॉस 16' च्या महाअंतिम सोहळ्याआधी त्याचे प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत. कलर्स चॅनलच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरी दोघे एकमेकांसमोर उभे आहेत. या दोघांमध्ये जबरदस्त टशन पाहायला मिळतेय. महाअंतिम सोहळ्यात शिव आणि प्रियांकाचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. यावेळी दोघांनी ब्लॅक आउटफिट परिधान केला आहे. त्यांना एकत्र पाहून चाहत्यांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
संपूर्ण सीझनमध्ये शिव-प्रियांकामध्ये 'काटे की टक्कर'
शिव ठाकरे आणि प्रियांका चहर यांच्यात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पाहायला मिळाली. सुरुवातीच्या फक्त काही दिवसांत त्यांच्यात मैत्री दिसली. पण, जेव्हा दोघांचेही विचार जुळले नाहीत तेव्हा त्यांच्या मैत्रीत फूट पडली. पण, जसजसा शो अंतिम टप्प्यात पोहोचतोय तसतशी यांच्यातील कटुता संपत चालली आहे.
कोण होणार 'बिग बॉस 16' चा महाविजेता?
शालिन भानोट, अर्चना गौतम, शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि प्रियांका चहर चौधरी यांच्यापैकी कोण विजेता ठरतो हे आज पाहायला मिळेल. 'बिग बॉस 16' चा महाअंतिम सोहळा आज म्हणजेच 12 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता कलर्स टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. तुम्ही ते OTT वर Voot वर देखील हा महाअंतिम सोहळा पाहू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :