Abdu Rozik Fees : 'बिग बॉस'च्या शोसाठी अब्दु रोजिकला मिळालं 'इतकं' मानधन; किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
Abdu Rozik, Bigg Boss 16 : तीन फुटी अब्दु रोजिक 'बिग बॉस 16' मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धक होता. तो दर आठवड्याला भरमसाठ रक्कम घेत असे.
![Abdu Rozik Fees : 'बिग बॉस'च्या शोसाठी अब्दु रोजिकला मिळालं 'इतकं' मानधन; किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल bigg boss 16 contestant abdu rozik fees per week in bigg boss house marathi news Abdu Rozik Fees : 'बिग बॉस'च्या शोसाठी अब्दु रोजिकला मिळालं 'इतकं' मानधन; किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/24/d93b768c6e57c90edd2c5ba9cb5c3e861671865596053358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Abdu Rozik Fees For Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) मध्ये एकापेक्षा एक स्पर्धक आहेत. या स्पर्धकांनी आपल्या अनोख्या सादरीकरणाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या घरात असेही अनेक स्पर्धक आहेत ज्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. बिग बॉसच्या घरातील एक सदस्य जो भारतीय नाहीये मात्र, तरीही या सदस्याला भारतातून भरभरून प्रेम मिळतंय. हा स्पर्धक म्हणजेच अब्दु रोजिक (Abdu Rozik). अब्दु रोजिक हा तजाकिस्तानचा रहिवासी आहे. उंचीने तीन फूट असणारा अब्दु आपल्या क्युट पर्सनॅलिटीने लाखो हृदयांवर राज्य केले. तो शोमधील टॉप 5 स्पर्धकांपैकी एक होता. अब्दु आठवड्यासाठी भरमसाठ रक्कम घेतो. अब्दुची नेमकी किती रक्कम घेतो ते पाहा.
'बिग बॉस 16' मध्ये अब्दू रोजिकची फी
अब्दु रोजिक हा तजाकिस्तानमधील प्रसिद्ध गायक आहे. याशिवाय तो एक प्रसिद्ध सोशल मीडिया सेलिब्रिटी देखील आहे. दुबईत अब्दुचा प्रचंड दबदबा आहे. अब्दु हे नाव जगभरात प्रसिद्ध आहे. 'बिग बॉस 16' मधील पहिल्या दिवसापासून तो प्रेक्षकांना इम्प्रेस करण्यात यशस्वी झाला आहे. तो दर आठवड्याला मोठी रक्कम घेतो. रिपोर्टनुसार, अब्दू रोजिक एका आठवड्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये घेतो. अब्दु शोमध्ये एकूण 11 आठवडे राहिला. या दरम्यान त्याने सुमारे 30 ते 33 लाख रुपये कमावले होते.
View this post on Instagram
अब्दु रोजिक 'बिग बॉस 16' मध्ये पुन्हा येणार
19 वर्षीय अब्दू रोजिकला काही काळापूर्वी शोमधून बाहेर जावे लागले होते. अब्दुला एक चांगली संधी आली होती जी त्याला गमवायची नव्हती. अशा परिस्थितीत, त्याच्या मॅनेजर आणि निर्मात्यांच्या संभाषणानंतर, अब्दू शोमधून बाहेर पडला. शोमध्ये अब्दूचे पुनरागमन होणार असं सर्वांनाच वाटत होतो. 'बिग बॉस'ने असेही म्हटले होते की, अब्दू शोमध्ये परत येऊ शकतो. मात्र, अद्याप अब्दू शोमध्ये आलेला नाही. अब्दुच्या पुनरागमनाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)