Big Boss Marathi: बिगबॉसचा छोटा पुढारी दिसणार 'या' बायोपिकमध्ये, घरातून बाहेर पडताच सुरु झाला सिनेसृष्टीतला प्रवास
घनश्याम दरवडे यांनी बीग बॉसमराठीवर आपल्या रसिक आणि सकारात्मक स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकली.
Ghanashyam Darode: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातून बाहेर पडलेला आणि छोटा पुढारी अशी ओळख असलेला घनश्याम दरवडे (Ghanashyam darvade) आता एका नेत्याच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. सोशल मीडियावर सध्या छोट्या पुढाऱ्याच्या सिनेप्रवासाची एकच चर्चा आहे. एकीकडे बिगबॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची जोरदार चर्चा असून घरातून बाहेर पडूनही घनश्यामने सिनेमा मिळवत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तो काम करत असलेला नवा सिनेमा 25 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अनिकेत विश्वासरावची प्रमुख भूमिकेत असलेला कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून यात वारकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन सांगोला मतदारसंघातून 11 वेळा निवडून आलेले आमदार गणपतराव देशमुख यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. या बायोपीकमध्ये घनश्यामची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.
घनश्यामला चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सूक
घनश्याम दरवडे यांनी बीग बॉसमराठीवर आपल्या रसिक आणि सकारात्मक स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकली. तो आता कर्मयोगी आबासाहेब या चरित्रात्मक नाटकात दिसणार आहे. या चित्रपटात गणपतराव देशमुख यांचा जीवनपट दाखवण्यात येणार आहे. सांगोला मतदारसंघातून ते 11 वेळा निवडून आलेले आमदार होते. त्यांनी 55 वर्षे त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील राजकारण आणि समाजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. आगामी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अल्ताफ दादासाहेब शेख यांनी केले आहे. मायका माऊली फिल्म प्रोडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने याची निर्मिती करण्यात आली आहे. संगीत अवधूत गुप्ते यांनी दिले आहे. या चित्रपटात त्यांचा आवडता स्पर्धक घनश्याम दरवडे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
View this post on Instagram
छोट्या पुढाऱ्याला मिळाली प्रसिद्धी
घनश्यामला १० वर्षांपूर्वी त्याच्या राजकीय नेत्याप्रमाणे बोलण्याच्या शैलीमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली. तेंव्हा तो केवळ १३ ते १४ वर्षांचा होता. त्याची मोठ्या नेत्यासारखं बोलण्याची ढब व्हायरल झाली होती. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीचा हा रहिवासी असून त्यानं राजकीय बायोपीकपासून खऱ्या अर्थानं सिनेसृष्टीत प्रवासाला सुरुवात केल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा: