एक्स्प्लोर

Colors Marathi : ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं!’ सुरु होणार समाधी सोहळा, मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

Balumamachya Navan Changbhala : महाराष्ट्रभर तूफान गाजलेली मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मालिकेवर भरभरून प्रेम केलं.

Colors Marathi : कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balumamachya Navan Changbhala) या लोकप्रिय मालिकेत आजवर बाळूमामांच्या अनेक लीला प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. विविध रूपात अन् विविध अवतारात बाळूमामांनी त्यांच्या अद्भुत लीलांनी त्यांच्या भक्तांना आणि 'कलर्स मराठी'च्या प्रेक्षकांना अनेकदा अचंबित केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मालिकेवर भरभरून प्रेम केलं. गेली अनेक वर्षं या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण आता ही लोकप्रिय भक्तिरसपूर्ण मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. 

बाळूमामांच्या अनाकलनीय आणि अवाक करणाऱ्या चरित्रातील अनेक प्रसंग रसिकांना ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत पाहायला मिळाले आहेत. शिवशंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या बाळूमामांचा नवा अवतार प्रेक्षकांना चांगलाच भावला.

महाराष्ट्रभर तूफान गाजली मालिका

महाराष्ट्र ही संताची भूमी. महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक थोर संत होऊन गेले, त्यातलेच एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे संत बाळूमामा. संत बाळूमामांनी भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याणचं खूप मोठं कार्य केलं. कलर्स मराठीवर काही वर्षांपूर्वी सुरू झालेली 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रभर तूफान गाजली. या मालिकेतील संत बाळूमामांचं बालपणातलं रूप आणि त्यांच्या बाललीलांनी रसिकांना अल्पावधीतच भुरळ घातलीचं पण मोठ्या रूपातील बाळूमामांनी ज्यांनी आपल्या अस्तित्वाने अकोळसारख्या छोट्या गावात आणि गावकऱ्यांमध्ये चैतन्य फुलवले त्या रूपालादेखील संपूर्ण महाराष्ट्राने भरभरुन प्रेम दिलं.

बाळूमामांच्या समाधीनंतर मालिका संपणार

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेच्या शेवटच्या भागात इलाज करायला आलेल्या डॉक्टरांना बाळूमामांनी परत पाठवून समाधी घेतल्याचं पाहायला मिळेल. एकंदरीतच बाळूमामांच्या प्रपंच्याचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना घडला. अवघा महाराष्ट्र 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या जयघोषाने दुमदुमला. 

'बिग बॉस मराठी' प्रेक्षकांच्या भेटीला

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं', 'रमा राघव' आणि 'पिरतीचा वनवा उरी पेटला' या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्या तरी बहुप्रतीक्षित 'बिग बॉस मराठी' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’चा Grand Premiere या रविवारी 28 जुलै, रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर पाहता येणार आहे.

हेही वाचा:

Shaniwar Upay : शनिवारी कुणालाच न सांगता गुपचुप करा 'ही' कामं; सर्व अडचणी होतील दूर, शनीची राहील कृपा                                

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget