Bai G marathi Movie : एकाच जन्मात नवरा बायकोला कंटाळतो पण..., वटपौर्णिमेच्या दिवशी 'बाई गं' सिनेमाचा टीझर रिलीज
Bai G marathi Movie : स्वप्नील जोशीच्या बाई गं सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यातआ ला असून नवरा बायकोच्या नात्याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
Bai G marathi Movie : स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), सुकन्या मोने (Sukanya Mone), प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere), दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, अदिती सारंगधर,नेहा खान असा कलाकारांचा फौजफाटा असलेला बाई गं हा सिनेमाला लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातलं एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे. जंतर मंतर असं हे गाणं सध्या सोशल मीडियावरही खूप ट्रेंड होतोय. त्यामुळे अनेकांच्या पसंतीस हे गाणं उतरलं आहे. आता नुकतच या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
बाई गं या सिनेमात स्वप्नील जोशी हा मुख्य भूमिकेत आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमध्ये एका कंटाळलेल्या नवऱ्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे. बायकोसोबत सतत होणाऱ्या भांडणांना कंटाळलेल्या नवऱ्याची भूमिका या सिनेमात स्वप्नील करत आहे. त्यासाठी त्याच्यासोबत एक प्रकार घडतो त्यानंतर त्याला मागच्या जन्मातल्या बायकांना देखील सांभाळावं लागतं.
टीझरमध्ये नेमकं काय?
लंडनमध्ये राहणाऱ्या जोडप्याची ही गोष्ट आहे. कितीही प्रेम केलं, कितीही त्याग केला तरीही शेवट हा भांडणानानेच होतो, असं स्वप्नील म्हणतो आणि या टीझरची सुरुवात होते. भांडणकरुन बायको घर सोडून गेलेली असते. तिला परत आणण्याचे प्रयत्न स्वप्नील करत असतो. तेव्हा त्याला देव सांगतो की, तुझ्या पत्नीवरचं प्रेम पाहून मी तुला एक संधी देतो. पण ही संधी विलक्षण किचकट आणि गुंतागुंतीची असणार आहे. तुझ्या गेल्या पाच जन्मातील बायकांच्या इच्छा तुला शोधून तुला त्या पूर्ण कराव्या लागतील. हे स्वप्नील मान्य करतो. त्यामुळे त्या बायकांच्या इच्छा काय असतात, त्या स्वप्नीलला कशा कळतात आणि तो त्या कशा पूर्ण करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
View this post on Instagram
'या' दिवशी येणार सिनेमा भेटीला
बाई गं हा सिनेमा येत्या 12 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पांडुरंग कृष्णा जाधव यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. डॉ.आशिष अग्रवाल, नितीन प्रकाश वैद्य, ओ एम जी मीडिया वेंचर्य यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. त्यामुळे आता या सिनेमाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.