लॉरेन्स बिष्णोई टोळीचा प्लॅन उघड; सलमानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर 10 दिवसांतच रचलेला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट
Baba Siddique Death Case: लॉरेन्स बिष्णोई गँगनं सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याच्या 10 दिवसांनंतर बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट रचला होता, असा खुलासा क्राईम ब्रांचच्या तपासात झाला आहे.

Baba Siddique Death Case: बाबा सिद्दीकींवर (Baba Siddique) गोळीबार केल्यावर शूटर शिवकुमार गौतम (Shiv Kumar Gautam) तब्बल अर्धातास हॉस्पिटलबाहेर उपस्थित होता. बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे की, नाही याची खातरजमा करण्यासाठी तो रूग्णालयाबाहेर थांबला होता, अशी माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या क्राईम ब्रांच करत आहे. क्राईम ब्रँचच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे. अशातच आता आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. लॉरेन्स बिष्णोई गँगनं सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याच्या 10 दिवसांनंतर बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट रचला होता, असा खुलासा क्राईम ब्रांचच्या तपासात झाला आहे.
लॉरेन्स बिष्णोई गँगनं सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याच्या 10 दिवसांनंतरच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचला होता. मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त असताना बिष्णोई गँगकडून बाबा सिद्दीकीला मारण्याचा कट सुरू केला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानला मारण्याचा बिष्णोई टोळीचा प्लॅन होता, पण तो यशस्वी न झाल्यानं लॉरेन्स टोळीनं त्याच्या घरावर गोळीबार करून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. या गोळीबाराच्या घटनेनंतर लॉरेन्स गँगनं आपल्या गुंडांना सलमानच्या जवळच्या लोकांना लक्ष्य करण्यास सांगितलं आणि याच योजनेअंतर्गत बाबाच्या हत्येचा कट रचला गेला. 14 एप्रिल 2024 रोजी सलमानच्या घरावर गोळीबार झाला होता.
बाबा सिद्दिकींच्या हत्येत बिष्णोई टोळीनं बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजचा वापर केल्याचं तपासात समोर आलं आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येवेळी बिष्णोई टोळीनं गोळीबार करणाऱ्यांशी आणि त्यात सहभागी असलेल्या त्यांच्या साथीदारांशी संवाद साधण्यासाठी हायटेक बेकायदेशीर टेलफोन एक्सचेंजचा वापर केल्याचं मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात उघड झालं आहे. या कॉलिंगचा वापर करून, अनमोल बिष्णोईनं शूटर शिवकुमार गौतम, झिशान अख्तर, शुभम लोणकर आणि सुजित सिंह यांच्याशी अनेकदा बोलले होते.
बिष्णोई टोळी या कॉलिंगचा वापर करते, जेणेकरून तपास यंत्रणा त्यांचा शोध घेऊ शकत नाहीत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिष्णोई टोळीनं कॉलिंगसाठी स्वतःचं टेलिफोन एक्सचेंज सुरू केलं. याद्वारे अनमोल बिष्णोईसोबत 4-5 जण एकत्र येतात. अनमोल शेवटी सहभागी होऊन मार्गदर्शन करतो, त्यामुळे तपास यंत्रणांना त्याबद्दल किंचितही पुरावा मिळत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
