Avatar Box Office Collection Day 4: 'झुकेगा नहीं साला...', 'धुरंधर'चा 500 कोटींच्या फिल्मला धोबीपछाड, बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई
Avatar Box Office Collection Day 4: 'अवतार' फ्रँचायझीमधील 'अवतार: फायर अँड अॅशेस' हा तिसरा सिनेमा आहे. पहिले दोन भाग भारतात प्रचंड हिट झाले होते आणि तिसरा भाग चांगला नफा कमावतोय.

Avatar Box Office Collection Day 4: जेम्स कॅमेरूनचा (James Cameron) 'अवतार: फायर अँड अॅशेस' (Avatar: Fire and Ash) हा चित्रपट गेल्या आठवड्यात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि तो चांगली कमाई करतोय. सध्याचा ब्लॉकबस्टर सिनेमा (Blockbuster Cinema) 'धुरंधर'ला (Dhurandhar) जोरदार टक्कर देत असला तरी, 'अवतार: फायर अँड अॅशेस' तशी फारशी कमाई करू शकलेला नाही. 'अवतार: फायर अँड अॅशेस'नं आठवड्याच्या शेवटी चांगली कमाई केली आहे. पण, सोमवारी 500 कोटींच्या 'अवतार: फायर अँड अॅशेस'ची कमाई लक्षणीयरीत्या घटल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी 'अवतार' ब्लॉकबस्टरपेक्षा खूपच मागे पडला. 'अवतार: फायर अँड अॅशेस'चं कलेक्शन जाणून घेऊयात...
'अवतार' फ्रँचायझीमधील 'अवतार: फायर अँड अॅशेस' हा तिसरा सिनेमा आहे. पहिले दोन भाग भारतात प्रचंड हिट झाले होते आणि तिसरा भाग चांगला नफा कमावतोय. सिनेमाला 100 कोटी क्लबमध्ये सामील होण्यास थोडा वेळ लागेल, कारण आठवड्याच्या शेवटी सिनेमाच्या कमाईत मोठी घट झालीय.
View this post on Instagram
सोमवारी कमाईत मोठी घट
'अवतार: फायर अँड अॅशेस'च्या कमाईत सोमवारी मोठी घट झाली. निर्मात्यांनाही एवढी घसरण अपेक्षित नव्हती. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, 'अवतार: फायर अँड अॅशेस'नं सोमवारी फक्त 8.50 कोटी कमावले, जे इतर दिवसांपेक्षा खूपच कमी आहे.
चित्रपटानं पहिल्या दिवशी 19 कोटी, दुसऱ्या दिवशी 22.5 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 25.75 कोटी कमावले. एकूण कलेक्शन आता 75.75 कोटींवर पोहोचलं आहे. जर चित्रपटाची कमाई अशीच सुरू राहिली तर चित्रपटाला 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यास थोडा वेळ लागेल.
'अवतार'ला 'धुरंधर'कडून धोबीपछाड
सोमवारी 'अवतार'नं फक्त 8.50 कोटी कमावले, तर 'धुरंधर'नं ती रक्कम दुप्पट केली आहे आणि 16.5 कोटी कमावले आहेत. जरी कलेक्शनमध्ये लक्षणीय घट झाली असली तरी, ते 'अवतार'पेक्षा खूप पुढे असल्याचं दिसून येतंय. 'धुरंधर'नं आधीच एकट्या भारतात 572 कोटी कमावले आहेत आणि अनेक विक्रम मोडले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























