एक्स्प्लोर

Atul Kulkarni On Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणी मराठी अभिनेत्याकडून प्रश्नांची सरबत्ती, पोस्ट करत काय म्हणाला, फक्त पकडल्यावर भोंदू त्यापूर्वी...

Atul Kulkarni On Ashok Kharat Case: महिलांच्या भावनांशी खेळत, अंधश्रद्धेचा फायदा घेऊन अशोक खरातनं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं. यावरच मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी संताप व्यक्त केला आहे.

Atul Kulkarni On Ashok Kharat Case: महिलांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) या भोंदूबाबाचे अनेक कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. पोलिसांकडे तक्रार करणारी महिला एकमेव नाही तर अशा अनेक महिलांचं त्यानं शोषण केल्याचं समोर येतंय. अशोक खरातच्या अत्याचाराचे 58 व्हिडीओ आतापर्यंत पोलिसांना सापडले आहेत. विकृत भोंदुबाबा अशोक खरातचे प्रताप समोर आल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात (Maharashtra News) खळबळ माजली आहे. सर्वच स्तरांतून या प्रकरणी संताप व्यक्त केला जातोय. अशातच आता मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे अशोक खरातवर भाष्य केलं आहे. 

महिलांच्या भावनांशी खेळत, अंधश्रद्धेचा फायदा घेऊन अशोक खरातनं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं. यावरच मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी (Marathi Actor Atul Kulkarni) यांनी संताप व्यक्त केला आहे. अतुल कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेक राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर ते आपलं मत व्यक्त करत असतात. कधी परखडपणे थेट, तर कधी कवितेच्या माध्यमातून अतुल कुलकर्णी व्यक्त होत असतात. अशातच आता अख्खं राजकारण ढवळून काढणाऱ्या अशोक खरात प्रकरणी त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. जर हे लोक पकडले गेले तरच भोंदू ठरतात, मग त्या आधी ते कोण असतात? असा सवाल अतुल कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.  

अतुल कुलकर्णी नेमकं काय म्हणाले? (Atul Kulkarni Social Media Post On Ashok Kharat)

अतुल कुलकर्णी यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. नेमकं काय म्हणाले अतुल कुलकर्णी सविस्तर पाहुयात... 

पकडले गेले कीच आणि तरच 'भोंदू'? त्या आधी ते काय असतात ? आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते?

ज्या वेळी कुणी 'महाराज' भोंदू 'निघतात, तेंव्हा त्यांचे भक्तं नेमके कोण होतात-भागीदार, पिडीत, अंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी, भाबडे, मूर्ख की आणखी कुणी?

श्रद्धा, अंध कधी होते? डोळस श्रद्धा म्हणजे काय ? डोळस आणि अंध श्रद्धां मधे अंतर किती असतं? अंध होण्याला कारणीभूत कोण असतं ? करणारे की होणारे? अंधळं होणाऱ्यांवर त्याची काही जबाबदारी असते की नसते ?

हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं (कुठल्याही धर्माच्या) तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का (कुठल्याही पक्षाच्या)?

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Atul Kulkarni (@atulkulkarni_official)

लैंगिक अत्याचारासोबतच अशोक खरातचं आर्थिक फसवणुकीचंही मोठं जाळं (Ashok Kharat Case)

नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात आता आणखी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. धार्मिक विधी, अंधश्रद्धा आणि भीती यांचा आधार घेत खरातने केवळ महिलांचे शोषणच नाही, तर आर्थिक फसवणुकीचंही मोठं जाळं उभं केलं होतं, अशी माहिती तपासातून उघड झाली आहे. 

कॅप्टन अशोक खरातप्रकरणी एसआयटी चौकशीला वेग आलाय. डिजिटल आणि फॉरेन्सिकच्या आधारे तपासाला सुरुवात झालीये. फोन कॉल तपासण्यासह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू झालंय. आर्थिक व्यवहार, खरातचं नेटवर्क तसंच सहकारी आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. अशोक खरातनं पाथर्डी गवळाणं, सिन्नर आणि शिर्डी, ओझर परिसरात कोट्यवधींची गुंतवणूक केल्याची माहिती आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलिसांकडू तपास सुरू आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Daisy Shah On Palaash Muchhal, Smriti Mandhana: 'पलाश-स्मृती क्युट कपल, त्यांच्यात पुन्हा...'; बॉलिवूड अभिनेत्रीच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget