Ashok Saraf On Marathi Veteran Actress Ranjana: 'रंजना मला फॉलो करायची...'; दिग्गज अभिनेत्रीसोबतच्या ऑनस्क्रिन, ऑफस्क्रिन केमिस्ट्रीवर काय म्हणाले अशोक सराफ?
Ashok Saraf On Marathi Veteran Actress Ranjana: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि हास्यसम्राट अशोक सराफ यांनी आजवर अनेक कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली. त्यापैकीच एक नाव म्हणजे, रंजना देशमुख.

Ashok Saraf On Marathi Veteran Actress Ranjana: तब्बल सहा दशकांहून अधिक काळ मराठी रसिक-प्रेक्षकांना खळखळून हसवणारं मराठमोळं व्यक्तीमत्त्व म्हणजे, अशोक सराफ (Ashok Saraf)... आणि प्रेक्षकांचे लाडके अशोक मामा. काही दिवसांपूर्वीच अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर, महाराष्ट्र सरकारकडूनही प्रतिष्ठीत 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार अशोक सराफांना प्रदान करण्यात आला.
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि हास्यसम्राट अशोक सराफ यांनी आजवर अनेक कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली. मराठी सिनेसृष्टीतील सर्वात नावाजलेली जोडी म्हणजे, अशोक आणि लक्ष्याची सुपरहिट जोडी. याव्यतिरिक्त अशोक सराफ यांनी अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबत काम केलं. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना अशोक सराफांनी दिग्गज अभिनेत्री रंजना (Marathi Actress Ranjana Deshmukh) यांचा उल्लेख केला. तसेच, त्यांच्यासोबतच्या पडद्यावरच्या आणि वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
दिग्गज अभिनेत्री रंजना देशमुख म्हणजे, मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Industry) गुणी अभिनेत्रींपैकी एक. कधीकाळी अभिनेत्री रंजना यांनी रुपेरी पडदा गाजवून सोडला. 80च्या दशकात सुपरहिट जोडी म्हणजे, अशोक सराफ आणि रंजना देशमुख. दोन्ही गुणी कलाकारांनी अनेक भूमिका साकारल्या. दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडायची. पण, दोघांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीसोबतच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही चांगली होती, असं अशोक सराफांनी सांगितलं. रंजना मला फॉलो करायची, असंही अशोक सराफ म्हणाले.
दिग्गज अभिनेत्री रंजनाबाबत बोलताना काय म्हणाले अशोक सराफ?
काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेते अशोक सराफ यांनी अमुक तमुक युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना अशोक सराफ यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी रंजना देशमुख यांच्यासोबतच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीवर वक्तव्य केलं.
अशोक सराफ म्हणाले की, "रंजना देशमुख खूप चांगली नटी होती. खूप मेहनती होती. एखादी गोष्ट जमत नाही म्हणजे काय... मी हे करून दाखवीनच... मला हे यायलाच पाहिजे... असं तिचं असायचं... ती मला फॉलो करायची, हे तिनंच मला सांगतिलं होतं... मी तुला बघते आणि काम करते, असं ती म्हणाली होती. माझ्यासोबत काम केल्यानंतरचे तिचे रोल बघा... पण, तिच्याकडे शिकण्याची खूप जिद्द होती. त्यामुळे ती ते करू शकली..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























