Ashok Saraf : धनंजय माने इथेच राहतात..., 'अशोक सराफ द वरजनिल हास्यसम्राट' यांच्या घराच्या नेमप्लेटने वेधलं साऱ्यांचं लक्ष
Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या घराच्या नेमप्लेटने सऱ्यांचच लक्ष वेधलं आहे. सध्या त्यांच्या घराच्या नेमप्लेटची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
Ashok Saraf : धनंजय माने इथेच राहतात का? या डायलॉगवर अवघा महाराष्ट्र आजही तितकचं प्रेम करतो. 80च्या दशकात आलेल्या अशी ही बनवाबनवी या सिनेमातील अनेक संवादाचे मीम्स आजही तितकेच लोकप्रिय आहे. त्यातले धनंजय माने हे विशेष आवडीचं पात्र. अशोक सराफांनी (Ashok Saraf) त्यांच्या इतर भूमिकांप्रमाणेच ही भूमिकाही अजरामर केलीये. त्यामुळे हल्लीची तरुण पिढी देखील हा सिनेमा अगदी आवडीने आजही पाहते. पण या सिनेमाचं अशोक सराफांच्या घरासोबत देखील एक खास कनेक्शन जोडलं गेलंय.
अभिनेते सुनील बर्वे यांनी नुकतच अशोक सराफांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी अशोक सराफांच्या घराच्या नेमप्लेटसोबत फोटो काढला आणि ही नेमप्लेट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. यावर अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे ही नेमप्लेटची भानगड नेमकी काय आहे? हे सुनील बर्वेंनी त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्टवरच खुलासा केला आहे.
सुनील बर्वेंची पोस्ट काय?
सुनील बर्वे यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांची पत्नी अपर्णा बर्वे, अशोक सराफ आणि निवेदिता सराफ दिसत आहेत. सोबतच अशोक सराफांच्या घराची नेमप्लेट देखील आहे. त्यावर लिहिलं आहे की, धनंजय माने इथेच राहतात. अशोक सराफ (द वरजनिल हास्यसम्राट) असं लिहिलं आहे. सुनील बर्वे यांनी त्यांच्या या पोस्टवर काल एकदा खात्रीच करून घेतली!! ते नक्की इथेच रहातात! सोशल मीडियावर सध्या या पोस्टनं साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे.
View this post on Instagram
अशोक सराफ यांची कारकीर्द
अशोक सराफ यांनी आजवर अनेक हिंदी-मराठी सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. विनोदी भूमिका साकरण्यासह खलनायकी भूमिका देखील त्यांनी तितक्याच ताकदीने साकारल्या आहेत. उत्तम हावभाव, विनोदाचं कमाल टायमिंग अशा अनेक गोष्टींमुळे ते सुपरस्टार झाले आहेत. नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जंमत, अशी ही बनवाबनवी, भुताचा भाऊ असे त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. अशोक सराफ सध्या 'नवरा माझा नवसाचा 2' या सिनेमाचं शूटिंग करत आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाची घोषणा झाली असून प्रेक्षकांना आता या सिनेमाची प्रतीक्षा आहे.