Mahesh Manjrekar: राज-उद्धव ठाकरेंची मुलाखत घेताना महेश मांजरेकर 'ते' वाक्य बोलून गेले, आशिष शेलारांनी वॉर्निंगच दिली
Ashish Shelar Targets Uddhav and Raj Thackeray: उद्धव व राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत चर्चेत. मुलाखतीनंतर भाजप नेते आशिष शेलार यांची जोरदार टीका. महेश मांजरेकरांनाही दिला सल्ला.

Ashish Shelar on Mahesh Manjrekar: मराठी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आणि मराठी अस्मितेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युती केली असल्याचं जाहीर केलं. यानंतर राजकारणातील राजकीय समीकरणं बदलली. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दोघांनी एकत्र मुलाखत दिली. दोघांची ही संयुक्त मुलाखत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली. या मुलाखतीत मुंबई तसेच महाराष्ट्राच्या निगडीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान, मुलाखतीनंतर सत्ताधाऱ्यांनी ठाकरे बंधूंवर टिकेची तोफ डागली. भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील ठाकरे बंधूंनवर निशाणा साधला. तसेच महेश मांजरेकरांनी राजकारणात पडू नये, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.
ठाकरेंना मुंबईकरांशी काहीही देणंघेणं नाही - आशिष शेलार
"हे सगळी लोक फिल्मी लोक आहेत. दिवसरात्र सिनेमा बघायचे, परिवारासोबत फाफडा जिलेबी खायची, इतरांबरोबर गप्पा मारायच्या, त्यांचं मुंबईकरांशी काहीही घेणंदेणं नाही", असं आशिष शेलार म्हणाले. "त्यांचा मुंबईच्या विषयाशी काही संबंध आहे का?", असा सवालही त्यांनी उपस्थित केला. "मुंबईकरांसाठी कधी ते रस्त्यावर उतरले आहेत का? मुंबईकर जेव्हा पुरात अडकले होते. तेव्हा कुणी बंगल्यावर किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होतं. हे दोन्ही भाऊ मुंबईच्या पुराव्यावेळी 26 जुलै रोजी इतरांसाठी कुठे दिसले होते का?", असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा माहिम मतदारसंघात पराभव झाला होता. शिवसेना ठाकरे गटाटे महेश सावंत यांनी त्यांचा पराभव केला होता. यावरून आशिष शेलार यांनी टोला लगावला. "तुम्ही घरातल्या व्यक्तीला जिंकवू शकला नाहीत. त्यांना लोकांनी घरी बसवलं. ज्यांनी घरी बसवलं, त्या ठाकरे गटासोबत तुम्ही हात मिळवणी केली. त्यामुळे मतदारांनी ज्यांना बसवलं, सत्तेमध्ये सेवा करण्याची संधी दिली. त्यांच्यावर तुम्ही टीका करताय, पहिले तुमच्या घरातल्या लोकांना कुणी घरी बसवलंय, ते आधी बघा", असं आशिष शेलार म्हणाले.
आशिष शेलारांकडून महेश मांजरेकरांना सल्ला
ठाकरे बंधुंची संयुक्त मुलाखत खासदार संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतली. या मुलाखतीनंतर आशिष शेलार यांनी महेश मांजरेकर यांनी सल्ला दिला. "महेश मांजरेकर हे एखाद्या पक्षाचा प्रचार करत असतील तर आमचं काही म्हणणं नाही. पण ते अभिनेता म्हणून आपण निष्पक्ष आहोत, असे दाखवून एखाद्या पक्षाचा प्रचार करणार असतील, तर मांजरेकरांनाही सडेतोड प्रत्युत्तर देऊ. त्यांनी अटल सेतू आणि कोस्टल रोडने प्रवास केला नाही का? त्यांना उपनगरीय रेल्वेतून फिरण्याची माहिती आहे का, ते अॅक्वा मेट्रोतून फिरलेत का? त्यामुळे महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये आणि पडायचं असेल तर त्यांना आम्ही दाखवू आता थांबायच नाय", असं आशिष शेलार म्हणालेत.
























