एक्स्प्लोर

10 दिवसांत गाजलेली वेब सिरीज पाहून अरविंद केजरीवालही थक्क; बिहार निवडणुकांच्या निकालानंतर Tweet, वेधलं लक्ष

केजरीवाल यांनी या वेब सीरिजवरून एक ट्वीट केलंय. बिहार निवडणुकांनंतर केजरीवाल यांनी केलेलं हे ट्विट लक्ष वेधून घेणारे आहे.

Arvind Kejriwal: काही चित्रपट आणि वेब सीरिज त्यांच्या दमदार कथानकामुळे सतत चर्चेत राहतात. अनेक वेब सीरिज केवळ सामान्य प्रेक्षकांनाच नाही, तर नामांकित व्यक्तींनाही इतक्या भावतात की त्या उघडपणे त्यांची प्रशंसा करतात. आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी नुकतीच रिलीज झालेल्या एका वेब सीरिजची भरभरून प्रशंसा केली आहे. या वेब सीरिजचे नाव आहे ‘महारानी सीझन 4’, ज्याबद्दल केजरीवाल यांनी ट्वीट केलंय. बिहार निवडणुकांनंतर केजरीवाल यांनी केलेलं हे ट्विट लक्ष वेधून घेणारे आहे.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

रविवारी केजरीवाल यांनी x अकाऊंटवर पोस्ट शेअर करत महारानी सीजन 4 “नक्की पाहावी” अशी शिफारस केली आणि संपूर्ण टीमच्या धैर्याचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, “सोनी लिव्हवर ‘महारानी 4’ वेब सीरिज जरूर पहा. आजच्या राजकारणाची कुरुप सत्य या सीरिजमध्ये अगदी स्पष्टपणे दाखवलं आहे. सत्य दाखवण्याची हिम्मत केल्याबद्दल संपूर्ण टीमला सलाम.” राजकारणावर आधारित या सीरिजमध्ये दाखवलेल्या सत्तासंघर्ष, भ्रष्टाचार आणि बॅकडोअर स्ट्रॅटेजींच्या चित्रणाकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले.


10 दिवसांत गाजलेली वेब सिरीज पाहून अरविंद केजरीवालही थक्क; बिहार निवडणुकांच्या निकालानंतर Tweet, वेधलं लक्ष

सीझन 4 मध्ये काय नवीन?

7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘महारानी 4’ मध्ये कथा बिहारच्या राज्यकारभारातून दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणाकडे सरकते.

-ह्यूमा कुरेशी पुन्हा राणी भारतीच्या भूमिकेत दिसते.

-राणी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देते आणि तिची मुलगी रोशनी पदभार सांभाळते.

-या सीझनमध्ये कोहिनूर हिऱ्याशी संबंधित नवीन राजकीय उपकथाही महत्त्वाची ठरते.सत्ता, विश्वासघात, पक्षांतर्गत कलह आणि राजकीय महत्त्वाकांक्षा यांचं तीव्र चित्रण कायम ठेवण्यात आलं आहे

‘महारानी’ फ्रँचायझीची परंपरा कायम

सुभाष कपूरच्या दिग्दर्शनातील ‘महारानी’ मालिका गेल्या तीनही सीझनपासून ग्रामीण-शहरी राजकारण,जातीव्यवस्थेची गुंतागुंत,कुटुंबीयांतील सत्तासंघर्ष आणि वास्तवाशी साधर्म्य असलेल्या राजकीय घटनांवर आधारित कथानक यामुळे चर्चेत राहिली आहे. चौथ्या सीझनमध्येही तेवढाच ताण, प्रसंग आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय धुरळा पाहायला मिळतो.केजरीवाल यांच्या या पोस्टवर काही मिनिटांतच हजारो प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांनी सीरिजचे वास्तववादी राजकीय चित्रण मान्य करत त्यांची शिफारस योग्य असल्याचं म्हटलं.

बिहारच्या विजयाचे खरे हिरो निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार; 'आप'ची पोस्ट व्हायरल

अतिशय चुरशीचा अंदाज व्यक्त केलेली बिहारची निवडणूक एकतर्फीच झाली आणि भाजपप्रणित एनडीएने (NDA) 202 जागा मिळवल्या. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन फक्त 35 जागांपर्यंत मजल मारू शकलं. आम आदमी पक्षाने मात्र या निवडणूक पद्धतीवर टीका केली आहे. आप पक्षाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून बिहारच्या विजयाचे खरे हिरो हे केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार असल्याचा टोला लगावला होता. बिहारमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने SIR पद्धत राबवली आणि ही निवडणूक आधीच सेट केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हेच बिहारच्या विजयाचे खरे शिल्पकार असल्याचं म्हणत आपने भाजपला टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget