एक्स्प्लोर

अरिजीत सिंह राजकारणात प्रवेश करणार? प्लेबॅक सिंगिंगमधून एक्झिटच्या घोषणेनंतर पुढे काय?

Will Arijit Singh Enter Politics After Retirement: अरिजीत सिंहने प्लेबॅक गायनातून निवृत्तीची घोषणा केली. भविष्यात राजकीय पक्ष सुरू करण्याच्या चर्चा.

Will Arijit Singh Enter Politics After Retirement: प्रसिद्ध बॉलिवूड गायक अरिजीत सिंह याने नुकतंच पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केली. अरिजीत सिंगने निवृत्तीची घोषणा करताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान, अरिजीत पुढे नेमकं काय करेल? त्याच्या भविष्यातील  नेमक्या योजना काय आहेत? असे अनेक प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित आहेत. दरम्यान, अरिजीत लवकरच एक राजकीय पक्ष सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरिजीत  सिंह लवकरच राजकीय पक्ष सुरू करण्याचा विचार करत आहे. त्याचा राजकीय प्रवास लवकरच सुरू होऊ शकतो.  2026च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत तो सहभाग घेणार नसल्याची माहिती आहे. तो सर्वात आधी तळागाळातील निवडणुका लढवण्याचा विचार करू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, अरिजीत सिंहने अद्याप त्याच्या राजकीय कारकि‍र्दीबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. रिपोर्ट्सनुसार, अरिजीत 2026मध्ये होणाऱ्या पश्चिम  बंगाल विधानसभा निवडणुका लढवणार नाही.  प्रथम तो ग्रासरूट लेव्हलच्या निवडणुका लढवू शकतो. अरिजीत हा पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जियागंजचा रहिवासी आहे. तो अत्यंत साधे जीवन जगतो आहे. अरिजीत बऱ्याचदा लोकांना मदत करताना दिसला. याचा त्याला राजकीय कारकि‍र्दीत मदत होऊ शकते, असं बोललं जात आहे.

अरिजीत सिंहने एका इन्स्टाग्राम पोस्टमधून प्लेबॅक सिगिंगमधून निवृत्तीची घोषणा केली. ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होताच चाहत्यांना प्रचंड धक्का बसला.  त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "मला इतके प्रेम देणार्‍या सर्व श्रोत्यांचे मी मनापासून आभार मानतो.  मी प्लेबॅक गायक म्हणून आता कोणतेही नवीन काम स्वीकारणार नाही. हा प्रवास खरंच अद्भुत राहिला आहे", असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलं. त्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली. चाहत्यांना मोठा धक्का बसला. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arijit Singh (@arijitsingh)

अरिजीतने आतापर्यंत गेल्या दशकभरात  बॉलिवूडला अनेक सुपरहिट  गाणी दिली आहेत.   'तुम ही हो,  चन्ना मेरेया, अगर तूम साथ हो,  राबता, केसरिया,  ए दिल है मुश्किल, तेरा यार हूँ मैं, तुझे कितना चाहते हैं' या गाण्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.  दरम्यान, 'ओ रोमिओ' या चित्रपटातील एका गाण्यालाही त्याने आपला आवाज दिला आहे.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf Emotional Father Death: शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
Aarti Solanki on Balancing Devi Murti: '...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
'...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
Janhavi Killekar Pune Missing Boy: कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
Drishyam 3 Marathi Actress: अजय देवगणच्या 'दृश्यम 3'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा जलवा; पोलिसाची भूमिका साकारली, शूटिंगचा अनुभव केला शेअर
अजय देवगणच्या 'दृश्यम 3'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा जलवा; पोलिसाची भूमिका साकारली, शूटिंगचा अनुभव केला शेअर

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
Gokul Election: वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Embed widget