Arbaaz Khan: परिणीतीनंतर अरबाज खानच्या गोड लेकीची झलक; अभिनेत्यानं ओंजळीत पकडत शेअर केला आनंद
रिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा यांनीही आपल्या मुलाची झलक नुकतीच दाखवली होती, त्याच दिवशी अरबाज आणि शूरा यांनीही हा खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केला.

Arbaaz Khan Baby Girl: बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) आणि त्यांची पत्नी शूरा खान (Shoora Khan) यांनी अखेर आपल्या लाडक्या मुलीची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. या दाम्पत्याने आपल्या लाडक्या लेकीच्या इवल्याशा हाता- पायांचा गोड फोटो शेअर करत त्याने एक हृदयस्पर्शी कॅप्शनही लिहिलाय . आज बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा यांनीही आपल्या मुलाची झलक नुकतीच दाखवली होती, त्याच दिवशी अरबाज आणि शूरा यांनीही हा खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केला. त्यांच्या गोड लेकीचं नाव त्यांनी 'सिपारा' असं ठेवलंय.
अरबाज आणि शूरा यांनी 5 ऑक्टोबर रोजी आपल्या मुलीचे स्वागत केले होते. त्यानंतर आज (19 नोव्हेंबर) रोजी त्यांनी तिची पहिली झलक इंस्टाग्रामवर टाकली. फोटोमध्ये दोघांनीही आपल्या मुलीच्या चिमुकल्या पावलांना प्रेमाने धरलंय . दुसऱ्या फोटोमध्ये 'सिपारा' आपल्या वडिलांचा अंगठा पकडून असल्याने हा क्षण अधिकच गोड वाटतो. या कोमल हातांना धरत या जोडीनं लिहिले की, “सगळ्यात छोटे हात - पाय, पण आमच्या हृदयाचा सर्वात मोठा भाग - सिपारा खान.”
View this post on Instagram
अरबाझने मुलीचं नाव काय ठेवलं?
याआधी 8 ऑक्टोबर रोजी या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव जाहीर केले होते. एका पोस्टमध्ये त्यांनी मुलीचे नाव “सिपारा खान” असल्याचे सांगत खास संदेश शेअर केला होता. शूराने कॅप्शनमध्ये “अल्हम्दुलिल्लाह” असे लिहून आपल्या मातृत्वाचा आनंद व्यक्त केला होता. अरबाज आणि शूरा यांचा विवाह 24 डिसेंबर 2023 रोजी झाला होता. अर्पिता खान शर्मा यांच्या मुंबईतील घरात झालेल्या या खास आणि खाजगी निकाह'ला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. लग्नाची घोषणा करताना अरबाजने सोशल मीडियावर लिहिले होते, “आप्तांच्या उपस्थितीत आज आम्ही दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. या खास दिवसासाठी तुमच्या आशीर्वादांची गरज आहे.”
अरबाजचा 22 वर्षांचा मुलगा अरहान हा त्याची पहिली पत्नी मलाइका अरोरापासून आहे. लग्न तुटल्यानंतरही अरबाज आणि मलाइका आपापसात सौहार्दपूर्ण नाते ठेवून अरहानची जबाबदारी समानपणे संभाळत आहेत. त्यामुळे दोघांच्या को-पेरेंटिंगची सर्वत्र चर्चा होते.चिमुकल्या सिपाराच्या आगमनाने आता अरबाज आणि शूरा यांच्या आयुष्यात नव्या आनंद आलाय. चाहत्यांनीही या नव्या पालकांवर प्रेमाचा वर्षाव केला असून छोट्या सिपाराला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
























