एक्स्प्लोर

Anupam Kher Post : 'फ्रेंडशिप डे'ला अनुपम खेर यांना आली सतीश कौशीक यांची आठवण; म्हणाले...

आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर दिवंगत सतीश कौशिक यांची आठवणीत एक फोटो शेअर केला आहे.

Anupam Kher Post : अनुपम खेर आणि सतीश कौशिक यांच्यातील जिवलग मैत्री सर्वांनाच माहीत आहे. मित्र सतीश कौशिक यांच्या अचानक जगाचा निरोप घेतल्याच्या दुःखातून अनुपम खेर अजूनही सावरलेले नाहीत. तसंच त्यांच्या जाण्यानंतर अनुपम खेर खऱ्या मित्राचं कर्तव्य पार पाडत सतीश कौशिक यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी घेतात. दुसरीकडे, आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर दिवंगत सतीश कौशिक यांची आठवणीत एक फोटो शेअर केला आहे. अनिल कपूर आणि सतीश कौशिक यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून अनुपम खेर यांनी मैत्रीची आठवण केली आहे. 

अनुपम खेर यांनी शेअर केली पोस्ट

अभिनेता अनुपम खेरने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या छायाचित्रात तो अभिनेता अनिल कपूरसोबत काळ्या रंगाच्या फॉर्मल पोशाखात दिसत आहे. दुसऱ्या फोटोत सतीश कौशिकही या दोघांसोबत दिसत आहेत. तिन्ही कलाकारांनी एकाच रंगाचे ड्रेस घातलेले दिसत आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अनुपम खेर यांनी आपला मित्र अचानक सोडून गेल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आणि लिहिलं, 'हॅप्पी फ्रेंडशिप डे! आज मला सतीशची खूप आठवण येत आहे.'

या पोस्टने यूजर्स भावूक झाले

सोशल मीडियावर अनुपम खेर यांची ही पोस्ट  पाहिल्यानंतर त्यांचे चाहते आणि सोशल मीडिया यूजर्स भावूक होताना दिसत आहेत. अनुपमच्या या पोस्टवर अनेक जणांनी दुख:त भावना व्यक्त केल्या आहेत. यासोबत एका चाहत्याने लिहिले की, 'सर तुमच्यासाठी हा खूप कसोटीचा काळ आहे.'

View this post on Instagram
 
A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेर आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक हे एकमेकांचे खूप जवळचे मित्र होते. मात्र याच वर्षी 9 मार्च रोजी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अनुपम खेर आणि अनिल कपूर हे दोघेही सतीशचे जवळचे मित्र आहेत. या तिघांनीही 'राम लखन' चित्रपटात एकत्र काम केले होते आणि तेव्हापासूनच तिघांची मैत्री घट्ट झाली.

अनुपम खेर यांच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचे झाले तर.. त्यांनी अलीकडेच कवी, तत्त्वज्ञ आणि निबंधकार, रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. 24 ऑगस्टला या सिनेमाच्या नावाची घोषणा होईल. शिवाय, अनुपम खेर दिग्दर्शक अनुराग बासूच्या आगामी 'मेट्रो...इन डिनो' या अँथॉलॉजी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, अली फजल आणि नीना गुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 29 मार्च 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय कंगना रणौतच्या आगामी 'इमर्जन्सी' सिनेमात सुद्धा अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांच्या भुमिकेत झळकणार आहेत

इतर महत्वाच्या बातम्या

Sushmita Sen : 'ताली'चे पोस्टर रिलीज होताच सुष्मिता ट्रोल ; अभिनेत्रीने सांगितला कटू अनुभव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget