Sushmita Sen : 'ताली'चे पोस्टर रिलीज होताच सुष्मिता ट्रोल ; अभिनेत्रीने सांगितला कटू अनुभव
सुष्मिता सेनच्या तालीच्या पोस्टरवर तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. आता अभिनेत्रीने सांगितले आहे की, तिने अशा कमेंट करणाऱ्या सर्व लोकांना ब्लॉक केले.
Sushmita Sen On Taali : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen) ओटीटी विश्वात अधिराज्य गाजवलं आहे. काही दिवसांपूर्वीच सुष्मिता सेनने (Sushmita Sen) 'ताली' (Taali) या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले. या पोस्टरला सुष्मितानं कॅप्शन दिलं, 'ताली- बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! ' साडी, लाल टिकली अन् गळ्यात माळ अशा लूकमधील फोटो सुष्मितानं शेअर केले. या चित्रपटात सुष्मिता एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. सुष्मिता ट्रान्सजेंडर गौरी सावंत (Gauri Sawant) यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सुष्मिता टाळी वाजवताना दिसत दिसत आहे. मात्र आता तिच्या या लुकमुळे लोक तिला चांगलेच ट्रोल करत आहेत. याबाबत अभिनेत्रीने खुलासा केला आहे.
सुष्मिता सेनला तिच्या लुककरता केले जात होते ट्रोल
सुष्मिता सेनने सांगितले की, जेव्हा 'ताली' चे (Taali) पोस्टर रिलीज केले गेले , त्यावेळी माझे कमेंट सेक्शन अतिशय वाईट कमेंट्सने भरले होते. लोक मला छक्का छक्का म्हणून ट्रोल करत होते. पुढे तिने सांगितले की, लोक माझा केवळ लुक पाहून मला ट्रोल करत आहेत. यावरून मला ट्रान्सजेंडर समुदायासोबत दररोज होणाऱ्या गैरवर्तनाची जाणीव झाली. त्यांना किती आणि कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागत असेल. ट्रोलचे प्रमाण जास्तच वाढत होते. त्यामुळे जे लोक वाईट कमेंट्स करत होते त्यांना मी ब्लाॅक केले.
गौरी सावंत कोण आहेत?
गौरी सावंत या अॅक्टिविस्ट आहेत. त्यांच्या आयुष्यावर आधारित जिवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या जिवनपटामध्ये सुष्मिता सेन ही गौरी सावंत यांची भूमिका साकारणार आहे. गौरी सावंत यांचा जन्म पुण्यात झाला. त्या समाजसेविका आहेत. गौरी या महिला आणि अनाथ मुलांसाठी काम करतात. कौन बनेगा करोडपतीच्या 9 व्या सिझनमध्ये देखील गौरी यांनी हजेरी लावली होती. सुष्मिता सेनच्या करिअरमध्ये 'आर्या' वेबसीरिजचा महत्त्वाचा वाटा आहे. या सीरिजचा तिसरा सीझन देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुष्मिताच्या आगामी चित्रपटांची आणि वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
'ताली' कधी होणार प्रदर्शित? (Taali Web Series Released Date)
ही बहुचर्चित सीरिज 15 ऑगस्ट 2023 रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होत आहे. रवी जाधव (Ravi jadhav) दिग्दर्शित या सीरिजचं लेखन क्षितीज पटवर्धन (Kshitij Patwardhan) यांनी केलं आहे. 'ताली' या वेबसीरिजचे सहा एपिसोड असणार आहेत. तृतीयपंथीयांचा संघर्ष उलगडणाऱ्या या सीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सुष्मिताच्या आगामी चित्रपटांची आणि वेब सीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.