एक्स्प्लोर

Anil Kapoor Son on Bollywood Exit:4 वर्षांपूर्वी एका सिनेमात झळकला, अनिल कपूरच्या मुलाने घेतला अभिनयातून ब्रेक? बॉलीवूड सोडल्याच्या चर्चेत सोडलं मौन, म्हणाला..

हर्षवर्धनने पुढे सांगितले की, तो निवडत असलेले चित्रपट हे मुख्य प्रवाहातील चित्रपटांपेक्षा वेगळे असतात.

Anil Kapoor Son Exit Bollywood Reaction: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा मुलगा अभिनेता हर्षवर्धन कपूर (Harshwardhan Kapoor) सध्या चर्चेत आहे, त्याच्या बॉलिवूड सोडल्याच्या चर्चेमुळे. खरतंर गेल्या चार वर्षांपासून हर्षवर्धन मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'थार'नंतर त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नसल्याने त्याने अभिनयातून ब्रेक घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर हर्षवर्धनने स्वतः या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Harshawardhan Kapoor:हर्षवर्धन कपूरचा बॉलिवूडला रामराम ?

सोशल मीडियावर एका चाहत्याने हर्षवर्धनला टॅग करत, "तू अभिनयापासून दूर का गेलास? तुझ्या अभिनयाचं नेहमीच कौतुक झालं आहे. पुन्हा तुला पडद्यावर पाहायचं आहे," अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर उत्तर देताना हर्षवर्धन म्हणाला, "मी अभिनय सोडलेला नाही. 'थार' रिलीज झाल्यापासून मी नवीन चित्रपटावर काम करत आहे. 'थार' बनवायलाच पाच वर्षे लागली होती. 'भवेश जोशी'सारखे चित्रपट एका वर्षात तयार होत नाहीत. माझ्या नव्या चित्रपटाचं चित्रीकरण 30 जूनला पूर्ण होणार आहे आणि मी त्याचा निर्माता देखील आहे."

हर्षवर्धनने पुढे सांगितले की, तो निवडत असलेले चित्रपट हे मुख्य प्रवाहातील चित्रपटांपेक्षा वेगळे असतात. त्यामुळे त्यांना पूर्ण होण्यासाठी अधिक वेळ लागतो. "लोकांना कलाकार वर्षाला तीन-चार चित्रपट करताना पाहायची सवय झाली आहे. पण 'भवेश जोशी', 'थार' किंवा 'AK vs AK' सारखे चित्रपट वारंवार बनत नाहीत. हे वास्तव आहे," असे तो म्हणाला.

नव्या चित्रपटाबाबत मोठा खुलासा 

हर्षवर्धनने आपल्या आगामी चित्रपटाबद्दलही उत्सुकता वाढवणारे वक्तव्य केले. "हा माझा आतापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे. तो खूप वेगळा आणि युनिक आहे," असा दावा त्याने केला. हर्षवर्धन कपूरने 2016 मध्ये 'मिर्झिया'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर 'भवेश जोशी सुपरहिरो', 'AK vs AK' आणि 'थार' यांसारख्या चित्रपटांत त्याने काम केले. 'थार'मध्ये त्याने अभिनयासोबत निर्मात्याची जबाबदारीही सांभाळली होती. सध्या त्याच्या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी त्याच्या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा:

Pune Tulapur Rave Party On American FIlm: पुण्यातली तुळापूर 'रेव्ह पार्टी' सेम टू सेम 'या' सिनेमावर आधारित? नशेत बेभान तरुण तरूणी, रात्रभर धिंगाणा, नावही तेच वापरलं; नेमका प्रकार काय?

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Vishal Dadlani On PM Modi Video: 'हा अहंकार सोडा, PR कमी करा, फालतू रील्स बनवणं बंद करा..' पीएम मोदींच्या व्हिडिओवर विशाल ददलानीची टीका; म्हणाला...
'हा अहंकार सोडा, PR कमी करा, फालतू रील्स बनवणं बंद करा..' पीएम मोदींच्या व्हिडिओवर विशाल ददलानीची टीका; म्हणाला...
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Embed widget