Andheri Fire : अंधेरीतील चित्रपटाच्या सेटला लागलेल्या आगीत 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू; राजश्री प्रोडक्शनचा सेटही जळून खाक
लव रंजनच्या (Luv Ranjan) आगामी चित्रपटाचा सेट आणि राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटाचा सेट या आगीत जळून खाक झाला.
![Andheri Fire : अंधेरीतील चित्रपटाच्या सेटला लागलेल्या आगीत 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू; राजश्री प्रोडक्शनचा सेटही जळून खाक Andheri Fire one man dead in massive fire in mumbai andheri at ranbir kapoor shradhha kapoor movie set Andheri Fire : अंधेरीतील चित्रपटाच्या सेटला लागलेल्या आगीत 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू; राजश्री प्रोडक्शनचा सेटही जळून खाक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/30/bc2c1c7288009b1ac7067e9c54a8e0dd1659162827_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Andheri Fire : मुंबईमधील (Mumbai) अंधेरी (Andheri) पश्चिम भागातील चित्रकूट मैदानावर तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवरील सामानाला काल (29 जुलै) आग लागली. सेटवर लायटिंगचे काम सुरू असताना आग लागली आहे. या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या दिग्दर्शक लव रंजनच्या (Luv Ranjan) आगामी चित्रपटाचा सेट आणि राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटाचा सेट या आगीत जळून खाक झाला.
आठ फायर इंजिन, पाच वॉटर जेटी, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आणि इतर उपकरणांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. रिपोर्टनुसार, मनीष देवाशी नावाच्या 32 वर्षीय तरुणाचा या आगीत मृत्यू झाला. या तरुणाला उपचारासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं पण नंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तर या आगीत एक जण जखमी झाला आहे.
परिसर धुराने व्यापला
आग लागल्यामुळे संपूर्ण परिसर धुराने व्यापला असून सध्या त्या सेटवर किती लोक अडकले, किती जणांची सुटका करण्यात आली, ही माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, चित्रकुट मैदानावर रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपटाचा सेट उभारण्यात आला होता. सेट वर लायटिंगचे काम सुरू होते त्यावेळी आग लागली आहे. पुढील आठवड्यापासून चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार होती. शेजारी राजश्री फिल्मचे दोन सेट होते. चित्रपटाचे नाव निश्चित नसून काही दिवसापूर्वी त्याचे शुटिंग पॅरिसला झाले. सेटचे काम सुरू असल्याने मोठ्या संख्या मध्ये कामगार आगीमध्ये अडकल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा:
- Mumbai Andheri Fire Live Updates : अंधेरीच्या चित्रकूट सेटला भीषण आग, प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
- Andheri Fire : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या आगामी सिनेमाच्या सेटला आग; सिनेमाचे नाव अद्याप गुलदस्त्यात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)