(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Panchayat 2 Web Series : फुलेरा नाही तर मध्य प्रदेशमधील 'या' गावामध्ये झालं पंचायत-2 चे शूटिंग; जाणून घ्या...
सीरिजमध्ये यूपीमधील बलिया जिल्ह्यातील फुलेरी गावाचे कथानक दाखवण्यात आलं आहे. पण येथे या सीरिजचे शूटिंग झालेलं नाही.
Panchayat 2 Web Series : काही दिवसांपूर्वी पंचायत सीरिजचा दुसरा सिझन प्रदर्शित झाला. सारिजचे कथानक, कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन या सर्व गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पंचायतच्या पहिल्या सिझनला जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढीच लोकप्रियता मिळत आहे. या सीरिजमध्ये यूपीमधील बलिया जिल्ह्यातील फुलेरा गावाचे कथानक दाखवण्यात आलं आहे. पण पंचायत 1 आणि पंचायत 2 या दोन्ही भागांचे शूटिंग हे सिहोरमधील महोदिया या गावामध्ये करण्यात आलेलं आहे.
मध्यप्रदेशात या वेब सिरीजचे झाले शूटिंग
पंचायत-2 या सीरिजचं शूटिंग महोदिया या गावामध्ये तीन महिने सुरु होते. या तीन महिने या सीरिजचे कलाकार या गावामध्ये राहिले होते. 5000 हून अधिक लोकसंख्या असलेले महोदिया गाव सिहोर जिल्ह्यापासून आहे किमी अंतरावर आहे. या गावामधील अनेक लोक शेती हा व्यवसाय करतात. हे गाव स्वच्छ आणि सर्व सुविधा उपलब्ध असणारे आहे. महोदिया गावाला या सीरिजमध्ये फुलेरीचं रुप देण्यात आलं आहे.
ही वेब सिरीज गावामध्ये घडणाऱ्या गोष्टींवर आधारित आहे. राजकुमारी सिंह सिसोदिया या महोदियाचे सरपंच आहेत. त्यांच्या पतीचे नाव लाल सिंह आहे. त्याचबरोबर हरीश जोशी हे पंचायत सचिव पदावर तर प्रताप सिसोदिया हे रोजगार सहाय्यक आहेत. या वेब सिरीजचे शूटिंग गावातील पंचायत इमारत, पाण्याची टाकी, गल्ल्यांसह अनेक घरांमध्ये करण्यात आले आहे.
View this post on Instagram
अॅमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात आलेल्या या सीरिजचे एकूण आठ एपिसोड आहेत. या सीरिजचे रघुबीर यादव हे हिरो आहेत. जितेंद्र कुमार, चंदन रॉय, फॅसल मलिक आणि सानविका या कलाकारांनी या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या सीरिजचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्र यांनी केले आहे.
हेही वाचा :