एक्स्प्लोर

'पुरुष ते स्त्रीपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता..'; भारतीय क्रिकेटरच्या लेकीची मोठी शस्त्रक्रिया, Emotional पोस्ट शेअर

Anaya Bangar Thanks Father for Support: अनाया बांगरने अलिकडेच Gender Affirmation Surgery पूर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर तिनं एक पोस्ट शेअर केली.

Anaya Bangar Surgery: माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर (Sanjay Bangar) यांची कन्या अनाया बांगर (Anaya bangar) सध्या बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. तिनं स्वत:च्या आयुष्यात बरेच बदल केले. पुरुषापासून स्त्री झाली.  तिनं नुकतंच थायलंड येथे जेंडर अफर्मिंग सर्जरी केली.  ही शस्त्रक्रिया तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. सर्जरी झाल्यानंतर अनायाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती शस्त्रक्रियेनंतर तिच्या वडिलांसोबत दिसत आहे. तिनं पोस्ट शेअर करत, 'हा प्रवास केवळ तिच्यासाठीच नव्हे, तर तिच्या संपूर्ण कुटुंबासाठीही सोपा नव्हता', अशी भावना व्यक्त केली. अनायाच्या चाहत्यांनी या पोस्टवर तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

अनायाने म्हटलं की,  'सुरुवातीला परिवाराला माझ्यातील बदल समजून घेणे आणि स्वीकारणे कठीण होते. याविषयी अनेक संभ्रम होते. हळूहळू सर्वांना समजले'.  तिने विशेषत: तिच्या वडिलांबद्दल एक खास गोष्ट सांगितली. 'या कठीण काळात वडिलांचा पाठिंबा हीच सर्वात मोठी ताकद ठरली. वडिलांकडून मिळालेला पाठिंबा खूप मोलाचा होता. माझे वडील माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते', असं अनाया आपल्या पोस्टमध्ये म्हणाली. तिनं आपल्या वडिलांसोबतचा फोटो सोशल मीडियात शेअर केला आहे. 'माझ्यासाठी शस्त्रक्रिया ही खूप मोठी गोष्ट होती.  पण वडिलांच्या पाठिंब्यामुळे ही गोष्ट मला शक्य वाटली', असं म्हणत अनायाने  आपल्या वडिलांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, अनाया बांगरने 2023 साली Hormone Replacement Therapy (HRT) ला सुरुवात केली. जेव्हा शरिरात बदल होत गेले, तेव्हा अनायाने आपल्यात होणाऱ्या बदलांबाबत उघडपणे चर्चा करण्यास सुरुवात केली. खरंतर या काळात तिला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. मुख्यत: क्रिकेटच्या मैदानात तिला अडचणींचा सामना करावा लागला होता.  शारीरिक बदलांमुळे तिच्या खेळात परिणाम झाला होता, अशी माहिती अनाया बांगरने दिली.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anaya Bangar (@anayabangar)

एका मुलाखतीत अनायाने, थेरपीच्या या प्रवासात कठीण तसेच त्रासदायक अनुभवांना सामोरे जावे लागले होते, असं सांगितलं.  मात्र, इतके होऊनही तिनं हे आव्हान स्वीकारुन स्वत:मध्ये बरेच बदल घडवून आणले. सध्या अनायाची तिच्या आयुष्यातील मोठी शस्त्रक्रिया पार पडली. तिनं पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Embed widget