एक्स्प्लोर

Anand Sagar Passed Away: बॉलिवूडवर शोककळा! 'रामायण’चे निर्माते रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन; गेली 15 वर्षे ‘या’ आजाराशी झुंज

‘रामायण’ ही अशी मालिका आहे जी 39 वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ही मालिका घराघरात पोहोचवण्यात रामानंद सागर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान होते.

Anand Ramanand Sagar Death: दूरदर्शनवरील ऐतिहासिक मालिका 'रामायण'चे निर्माते रामानंद सागर यांचे सुपुत्र आनंद रामानंद सागर चोप्रा ( Anand Ramanand Sagar) यांचे निधन झाले आहे. 13 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईत त्यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपट आणि दूरदर्शन विश्वात शोककळा पसरली आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी सागर घराण्याची परंपरा समर्थपणे पुढे नेली होती. 

मुंबईत पार पडले अंत्यसंस्कार

आनंद सागर यांचे निधन मुंबईत झाले. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील परमहंस स्मशान घाट येथे सायंकाळी 4.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी जाहीर केली. पोस्टमध्ये त्यांच्या छायाचित्रासह “आमचे प्रिय वडील आनंद रामानंद सागर चोप्रा यांच्या निधनाची दुःखद माहिती देत आहोत,” असे नमूद करण्यात आले.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepak Yadav (@deepakyadav___)

‘या’ आजाराशी होती झुंज

आनंद सागर गेल्या सुमारे 15 वर्षांपासून पार्किन्सनसारख्या गंभीर न्यूरोलॉजिकल आजाराशी झुंज देत होते. अखेर दीर्घ आजाराशी झुंज अपयशी ठरली. सागर कुटुंबाने निवेदन जारी करत म्हटले, “अत्यंत दुःखाने सागर परिवार प्रिय आनंद रामानंद सागर यांच्या निधनाची माहिती देत आहे. आज (13 फेब्रुवारी) त्यांचे निधन झाले. ते ‘सागर आर्ट्स’च्या दुसऱ्या पिढीच्या व्यवस्थापनाचा भाग होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती.”

‘रामायण’मध्येही महत्त्वाचे योगदान

आनंद सागर यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या कामात सक्रिय सहभाग घेतला होता. 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या रामायण मालिकेत त्यांनी सह-निर्माता म्हणून काम पाहिले. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी पौराणिक आणि भक्तिपर प्रकल्पांच्या निर्मिती, सर्जनशील देखरेख आणि व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.

वडिलांची परंपरा अशी नेली पुढे

पाच भावंडांपैकी आनंद सागर यांनी सागर कुटुंबाची परंपरा जपण्याची जबाबदारी उचलली. अलिफ लैला, जय जय बजरंगबली आणि जय शिव शंकर यांसारख्या मालिकांची निर्मिती त्यांनी केली. तसेच ‘आंखें’ आणि ‘अरमान’सारख्या चित्रपटांच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. रामायण ही मालिका प्रत्येक भारतीयाच्या घरात पोहोचलेली मालिका होती. कोरोना लॉकडाउनदरम्यान कुटुंबासह रामायणचे पुनःप्रसारण करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. या पुनर्प्रसारणालाही प्रेक्षकांनी विक्रमी प्रतिसाद दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget