एक्स्प्लोर

Firaq Gorakhpuri: जेव्हा मीना कुमारी यांना पाहताच फिराक गोरखपुरी यांनी मुशायरा सोडला, वाचा काय आहे किस्सा...

Firaq Gorakhpuri: फिराक गोरखपुरी हे गालिब आणि मीर यांच्यानंतरचे सर्वात मोठे शायर होते, असं प्रसिद्ध गीतकार आणि शायर निदा फाजली म्हणाले होते.

मौत का भी इलाज हो शायद 

ज़िंदगी का कोई इलाज नहीं 

मृत्यूवरही इलाज असू शकतो, 
आयुष्याला इलाज नाही.

प्रसिद्ध उर्दू भाषेतील शायर फिराक गोरखपुरी यांनी लिहिलेल्या या ओळी जीवनातील त्रास आणि जगण्याच्या संघर्षाबद्दल बरच काही सांगून जातात. फिराक यांच्या शायरीचा अर्थ समजणे हे फारच कठीण आहे, असं बोललं जात. फिराक साहेब मुशायऱ्यात शायरी वाचताना मनातील व्यथा मांडतानाच समाजातील कटू वास्तव कधी सांगून जायचे याचा अंदाज येत नव्हता. फिराक हे गालिब आणि मीर यांच्यानंतरचे सर्वात मोठे शायर होते, असं प्रसिद्ध गीतकार आणि शायर निदा फाजली म्हणाले होते. फिराक हे खूप रागीष्ट स्वभावाचे होते. फिराक गोरखपुरी यांना मुशायरांची खूप आवड होती. मात्र त्यांनी एकदा चक्क रागाच्या भरात मुशायरा सोडला. याचं कारण ठरल्या त्या म्हणजे अभिनेत्री मीना कुमारी.

हा किस्सा 1959 किंवा 1960 मधील असल्याचे सांगण्यात येते. जेव्हा फिराक यांना मुशायऱ्यासाठी बोलावण्यात आले होते. फिराक यांचे खरे नाव 'रघुपती सहाय' होते. 'फिराक गोरखपुरी: द पोएट ऑफ पेन अँड एक्स्टसी' या पुस्तकात या घटनेचा उल्लेख आहे. फिराक यांच्या या चरित्रात्मक पुस्तकाचे लेखन अजय मानसिंग यांनी केलं आहे. जे फिराक यांचे नातेवाईक आहेत.

फिराक या मुशायराला पोहोचल्यावर टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत झाले आणि मुशायरा पूर्ण उत्साहात सुरुवात झाला. सुमारे तासाभरानंतर अभिनेत्री मीना कुमारी या देखील हा मुशायरा ऐकण्यासाठी कार्यक्रमस्थळी दाखल झाल्या. मीना कुमारी या देखील हा मुशायरा ऐकण्यासाठी येथे आल्या आहेत, असं कळल्यानंतर मुशायरा ऐकण्यासाठी आलेले बरेच लोक मुशायरा सोडून त्यांना पाहण्यासाठी धावाधाव करू लागले. यामुळे फिराक यांना संताप अनावर झाला. संपातलेल्या फिराक यांनी मुशायरा सोडून जाण्याचा निर्णय घेतला. ते मुशायरा सोडून निघालेच होते की, आयोजकांनी त्यांना विनंती करून थांबण्याचा खूप प्रयत्न केला.  

फिराक मुशायरा सोडून जात असल्याचे कळताच मीना कुमारी यांनी देखील त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाल्या, ''फिराक साहेब, मी खास तुम्हाला ऐकण्यासाठी म्हणून येथे आली आहे.''  यावर ते म्हणाले, ''मुशायरा आता मुजरा झाला आहे. अशा मैफिलीशी माझा काही संबंध नाही.'' यानंतर फिराक तेथून निघून गेले. यानंतरच्या दुसऱ्या दिवशी ते म्हणाले, ''मी मीना कुमारी यांच्यामुळे मुशायरा सोडला नाही. मी आमचा अपमान करणाऱ्या आयोजक आणि प्रेक्षकांच्या वागणुकीमुळे हा मुशायरा सोडला. मुशायरा हे कवितेचे व्यासपीठ आहे. इथले कलाकार फक्त कवी आहेत.''

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Supriya Sule on Santosh Deshmukh : संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
भाजप लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार? सबळ पुराव्याचा आधार घेण्याची शक्यता
Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines at 2PM 29 January 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्सDhananjay Munde : धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर, प्रल्हाद जोशींच्या निवासस्थानी दाखलSaif Ali Khan Case : सैफच्या आरोपीला नेताना गाडी बंद, पोलिसांनी दिला धक्का | VIDEOAnjali Damania On Ajit Pawar : पोलिसांना लाज वाटली पाहिजे..,अंजली दमानिया संतापल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Supriya Sule on Santosh Deshmukh : संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
भाजप लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार? सबळ पुराव्याचा आधार घेण्याची शक्यता
Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
Share Market : भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन,अर्थसंकल्पाकडून आशा 
अर्थसंकल्पाकडून आशा,भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन 
Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
Embed widget