Yami Gautam : 'A Thursday' सिनेमाचा टीझर आऊट, यामी गौतमचा अनोखा अंदाज
A Thursday : यामी गौतमच्या 'ए थर्सडे' सिनेमाचा टीझर आऊट झाला असून सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Yami Gautam A Thursday : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या (Yami Gautam) 'ए थर्सडे' (A Thursday) सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. तसेच सिनेमाचा ट्रेलर गुरुवारी (उद्या) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
टीझरमध्ये केकपासून ते जेवणापर्यंत अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. तसेच बालवडीतल्या मुलांना यामी 'ट्विंकल-ट्विंकल' ही कविता शिकवताना दिसत आहे. शेवटी बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज येतो आणि सर्व काही शांत होते. यामीने निळ्या रंगाची डेनिम आणि शॉर्ट कुर्ता परिधान केला आहे. ट्रेलरमध्ये यामीचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
टीझरमध्ये सस्पेन्स निर्माण केला आहे. यामी गौतमची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात थरार नाट्य असणार आहे. हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अनेक रंजक वळणे असणार आहेत. 'ए थर्सडे' हा सिनेमा प्रेक्षकांना रोमांचकारी अनुभव देणार आहे. बेहजाद खंबाटा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
संबंधित बातम्या
Gehraiyaan Song : दीपिका पदुकोणच्या 'गेहरांईया' सिनेमातील 'बेकाबू' गाणे रिलीज
Sam Fernandes : सिनेनिर्माते सॅम फर्नांडिसने आदित्य पांचोली विरोधात केली तक्रार दाखल
Kangana Ranaut : कंगना रनौतच्या वेब शोमध्ये होणार शहनाज गिलची एन्ट्री?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha