Heropanti 2 : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर टायगर श्रॉफचा 'हीरोपंती 2' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
Heropanti 2 : टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाचा 'हीरोपंती 2' हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Heropanti 2 OTT Release : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) 'हीरोपंती 2' (Heropanti 2) या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. या सिनेमात तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि नवाजु्द्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) मुख्य भूमिकेत होते. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
'हीरोपंती 2' या सिनेमात टायगरने बबलू हे पात्र साकारले होते. तर अमृता सिंहने त्याच्या आईची भूमिका साकारली होती. तसेच नवाजुद्दीन सिद्दीकी या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत होते. त्यांच्या पात्राचे नाव लैला असे आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळला आहे. टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज
'हीरोपंती 2' हा सिनेमा प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. 27 मे पासून प्रेक्षकांना हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. टायगर श्रॉफने सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असल्याचे जाहीर करत लिहिले आहे, ओटीटी प्लॅटफॉर्म जगभरातील सिनेप्रेमींपर्यंत चांगले सिनेमे पोहोचवण्याचे काम करतात. 'हीरोपंती 2' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शन, रोमान्स आणि ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
तारा सुतारियाने लिहिले आहे, 'हीरोपंती 2' मध्ये प्रेक्षकांना अॅक्शन, रोमान्स, नाट्य, विनोद पाहायला मिळणार आहे. अनेक देशांत कोरोनाकाळात या सिनेमाचे शूटिंग झाले आहे. 27 मे रोजी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचा मला खूप आनंद होत आहे.
'हीरोपंती-2' चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
'हीरोपंती-2' चित्रपटानं ओपनिंग-डे ला 6.25 कोटींची कमाई केली. या चित्रपटानं आत्तापर्यंत 16 कोटींची कमाई केली. हीरोपंती-2 चित्रपटामध्ये टायगरसोबतच अमृता सिंह,नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तारा सुतारिया यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 2014 मध्ये रिलीज झालेल्या हीरोपंती या चित्रपटाचा हा दुसरा पार्ट असणार आहे. 'हीरोपंती-2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. कारण टायगरच्या हीरोपंतीसमोर अजय देवगणचा 'रन-वे 34' टिकला नव्हता.
संबंधित बातम्या