एक्स्प्लोर

Amol Kolhe Emotional Post: जेव्हा एक मार्ग बंद होतो ...; ' मी सावित्रीबाई.. 'मालिका बंद करताच अमोल कोल्हे यांची काळाजाचा ठाव घेणारी पोस्ट; म्हणाले..

या मालिकेत महात्मा ज्योतिरावांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी मालिका संपत असल्याने एक भावनिक पोस्ट केली आहे.

Amol Kolhe Emotional Post After Mi Savitribai Phule serial Off-air: गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वात 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' (Mi Savitribai Jyotirao Phule) मालिका बंद करण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.  अवघ्या 152 भागांमध्ये टीआरपीचे कारण देत ही मालिका गुंडाळण्यात आली. यानंतर स्टार प्रवाह वाहिनीच्या ( Star Pravah) निर्मात्यांवर प्रेक्षकांचा प्रचंड रोष वाढला आहे. सोशल मीडियावर ही मालिका बंद करू नये अशा आशयाच्या हजारो कमेंट्स व्हायरल होत आहेत. स्टार प्रवाहला 'बायकॉट' करा अशी मागणीही होऊ लागली आहे. ज्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी विषमतेच्या अंधारात क्रांतीची ज्योत तेवत ठेवली, त्यांचा इतिहास जागवणाऱ्या 'मी सावित्री ज्योतीराव फुले'  मालिकेला हटवून त्याजागी स्टार प्रवाह वाहिनी 'सूना येती घरा' ही मालिका सुरु करणार आहे. त्यामुळे आणखी किती दिवस कटकारस्थाने, घरगुती भांडणं, पाणी टाकून वाढवता येणाऱ्या मालिका दाखवल्या जाणार ? असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान, या मालिकेत महात्मा ज्योतिरावांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी मालिका संपत असल्याने एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

खरंतर काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाह वाहिनीने टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आठ नव्या कोऱ्या मालिकांची घोषणा केली. मालिकांच्या या सपाट्यात 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले ' मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मालिकेचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे.  अनेक जण टीव्हीवर, ओटीटीवर  ही मालिका आवर्जून पाहतात.  ऐतिहासिक मूल्य असलेली ही मालिका बंद होऊ नये, अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे.

अमोल कोल्हे यांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट ...

काही दिवसांपूर्वी अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांनी मालिका अवघ्या पाच महिन्यात संपते आहे. अवघ्या 152 भागांमध्ये ही मालिका बंद होत आहे हे दुर्दैव असल्याचं म्हटलं होतं. मालिका बंद होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. मात्र, चॅनल त्यांचा निर्णयावर ठाम असल्याचे पाहून अमोल कोल्हे यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. ते म्हणाले 'जेव्हा एक मार्ग बंद होतो, तेव्हा कुठेतरी नवी सुरवात खुणावत असते..थोडसं थांबणं आवश्यक असतं. जरा निवांत होणं गरजेचं असतं. पुन्हा नव्याने गणित मांडण्यासाठी..दुप्पट वेगाने झेपावण्यासाठी..नव्या उमेदीने नव्या लढ्यासाठी.. ' असं लिहीत त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.  चॅनलवरील मालिका संपतेय, मात्र गोष्ट सुरू राहणार..! लढा थांबणार नाही ! असंही त्यांनी म्हटलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

चाहत्यांच्या कमेंट्स

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या या व्हिडिओ खाली या मालिकेच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं 'अमोल सर शेवटी सत्याचा विजय होतो. आपण करत असलेलं कार्य हे आज घराघरात गेलं आहे. सौ ज्योती चे विचार कधी संपणार नाही उलट ती ज्योत अजून झळकत राहील. ' अनेक चाहत्यांनी ही मालिका बंद करू नका अशा विनवण्या केल्या आहेत. काहींनी स्टार प्रवाह मालिका ' बायकॉट ' करा असं लिहिलं आहे.

हेही वाचा:

 घरगुती लफडी, फुटकळ भांडणांपेक्षा .. 'मी सावित्रीबाई..' मालिका बंद झाल्याचं कळताच प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया; अमोल कोल्हे यांची पोस्ट व्हायरल

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
AIच्या मदतीने साकारलेला मराठी चित्रपट; ‘त्यांची वारी’चा अभिनव प्रयोग; YouTubeवर पाहता येणार
AIच्या मदतीने साकारलेला मराठी चित्रपट; ‘त्यांची वारी’चा अभिनव प्रयोग; YouTubeवर पाहता येणार
15 ऑगस्टच्या सुट्टीला काय पहाल? ‘शेरशाह’ ते ‘उरी’, देशभक्तीचा जोश वाढवणाऱ्या 7 चित्रपटांची लिस्ट
15 ऑगस्टच्या सुट्टीला काय पहाल? ‘शेरशाह’ ते ‘उरी’, देशभक्तीचा जोश वाढवणाऱ्या 7 चित्रपटांची लिस्ट
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Embed widget