Amol Bawdekar Suffers Heart Attack: 'डॉक्टर, मला तीन तास द्या... मी प्रयोग करून येतो, मग ऑपरेशन करा'; हार्ट अटॅकनंतरही अभिनेत्याची डॉक्टरांकडे मागणी, अन्...
Amol Bawdekar Suffers Heart Attack: अमोल बावडेकरांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर 'सुंदर मी होणार' या नाटकाचा प्रयोग रविवारी सकाळी रद्द करावा लागला. त्यानंतर अमोल बावडेकरांवर तात्काळ अँजिओग्राफी करण्यात आली.

Amol Bawdekar Suffers Heart Attack: मराठी इंडस्ट्रीतील गाजलेलं नाव म्हणजे, अमोल बावडेकर (Actor Amol Bawdekar). फक्त सिनेसृष्टीच नाहीतर मालिकाविश्व आणि त्यासोबतच रंगभूमीवरही अमोल बावडेकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या अमोल बावडेकर 'सुंदर मी होणार' नाटकामुळे (Sundar Mi Honar Marathi Natak) चर्चेत आहेत. याच नाटकाच्या रविवारच्या (15 जून) प्रयोगाच्या आधी मात्र, एक अघटीत घटना घडली. अमोल बावडेकरांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तात्काळ अँजिओग्राफी (Angiography) करण्यात आली. पण, अँजिओग्राफीपूर्वी मात्र अभिनेत्यानं डॉक्टरांकडे एक हादरवणारी मागणी केली. या मागणीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण, यातूनच अमोल बावडेकर यांचं आपल्या कामाप्रती आणि रंगभूमीवर असलेल्या प्रेमाची जाणीव सर्वांनाच होते.
natakvedamarathimaanus या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये अंगावर काटा आणणारी माहिती देण्यात आली आहे. मराठी अभिनेते अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली गेली. सध्या अमोल बावडेकर 'सुंदर मी होणार' नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहेत. अमोल बावडेकरांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर 'सुंदर मी होणार' या नाटकाचा प्रयोग रविवारी सकाळी रद्द करावा लागला. त्यानंतर अमोल बावडेकरांवर तात्काळ अँजिओग्राफी करण्यात आली. पण, त्यांच्या ऑपरेशनपूर्वी अमोल बावडेकरांनी डॉक्टरांकडे हादरवणारी मागणी केली.
View this post on Instagram
natakvedamarathimaanus या इन्स्टाग्राम पेजवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, "डॉक्टर, मला तीन तास द्या.. मी प्रयोग करून येतो.. मग माझं ऑपरेशन करा" 'सुंदर मी होणार' नाटकाच्या प्रयोगापूर्वी अमोल बावडेकरांना हृदयविकाराचा झटका; तरीही रंगमंचावर येण्याची तयारी! रविवारी सकाळी 'सुंदर मी होणार' या नाटकाच्या प्रयोगाला काही तास उरले असतानाच अभिनेते अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा झटका आला. अमोल यांच्या पत्नी प्रेरणा बावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावरही बावडेकर यांनी डॉक्टरांना विनंती केली की, "मला फक्त तीन तासांची परवानगी द्या. मी प्रयोग करून येतो आणि मग तुम्ही माझी शस्त्रक्रिया करा." मात्र, डॉक्टरांनी अर्थातच याला परवानगी दिली नाही. त्यामुळे दीनानाथ नाट्यगृहातील जवळपास हाऊसफुल्ल प्रयोग रद्द करावा लागला. डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असला तरी, ते लवकरच 'सुंदर मी होणार' या नाटकाच्या प्रयोगांसाठी परत येतील. दरम्यान, बावडेकर यांच्या अनुपस्थितीत नाटकाचे काही प्रयोग अभिनेते अनिरुद्ध जोशी करणार आहेत"
नेमकं घडलं काय?
रविवारी (15 जून) सकाळी, 'सुंदर मी होणार' या नाटकाच्या काही तास आधी, अभिनेते, गायक अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा झटका आला. अमोल बावडेकर यांच्या पत्नी प्रेरणा बावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अमोल बावडेकर यांनी डॉक्टरांना विनंती केली, "मला फक्त तीन तासांची परवानगी द्या. मी नाटक सादर करेन आणि परत येईन. मग तुम्ही माझी शस्त्रक्रिया करू शकता..." अर्थातच, डॉक्टरांनी ही परवानगी दिली नाही. अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर, दीनानाथ नाट्यगृहातील जवळजवळ हाऊसफुल्ल होणारा कार्यक्रम रद्द करावा लागला. डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असला तरी, ते लवकरच 'सुंदर मी होणार' या नाटकाच्या सादरीकरणासाठी परतणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























