एक्स्प्लोर

Amitabh Bachchan Ranbir Kapoor Invested In Ayodhya: राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता

Amitabh Bachchan Ranbir Kapoor Invested In Ayodhya: अयोध्या आलिशान रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा आणि आध्यात्मिक पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनतंय. त्यामुळे सध्या इथे गुंतवणुकीसाठी बॉलिवूडकरांचा वाढता ओढा पाहायला मिळतोय.

Amitabh Bachchan Ranbir Kapoor Invested In Ayodhya: अभिनेते अमिताभ बच्चन (Actor Amitabh Bachchan) यांनी अयोध्येत जमिनीचे अनेक भूखंड खरेदी (Plot Purchase) करण्यासाठी सुमारे 90 कोटी रुपयांची गुंतवणूक केलीय. तसेच, रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यानं राम मंदिर (Ram Mandir) परिसराजवळील एका आलिशान भूखंडासाठी 3.31 कोटी रुपयांची गुंतवणूक केलीय. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर, अयोध्येचा (Ayodhya) कायापालट होत असून हे शहर आलिशान रिअल इस्टेट (Real Estate), पायाभूत सुविधा आणि आध्यात्मिक पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनतंय. इथे नव्या हॉटेल्सपासून ते कनेक्टिविटी अनेक विकासकामं होत आहेत.

अमिताभ बच्चन यांची अयोध्येत 90 कोटींची मालमत्ता (Amitabh Bachchan Property Worth 90 Crore In Ayodhya)

बॉलिवूडमधील (Bollywood News) दिग्गज कलाकारांपासून ते बड्या उद्योजकांपर्यंत अनेकांनी अयोध्येत मोठी गुंतवणूक केलीय. राम मंदिराच्या उभारणीपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी (Bollywood Celebrity) रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी अयोध्येला (Ayodhya News) आपली पसंती दिल्याचं आपल्या कानावर आलं असेलच. यात सर्वात मोठं नाव होतं, बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं. 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत मालमत्तेचा एक मोठा पोर्टफोलिओ उभा केला आहे. NBT नं दिलेल्या वृत्तानुसार, त्यांची एकूण गुंतवणूक 90 ते 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे. 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' (HoABL) या डेव्हलपरच्या माध्यमातून शहरातील आलिशान रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करणारे ते पहिलेच बडे सेलिब्रिटी ठरले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी रातोंरात केलेली गुंतवणूक (Amitabh Bachchan Invested In Ayodhya)

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना अभिनंदन लोढा यांनी 2023 मधील एका घटनेचा किस्सा सांगितलेला, जेव्हा ते ऑस्ट्रेलियात होते. एक दिवस पहाटे 3 वाजता त्यांना एक फोन आला. त्या फोनपूर्वी त्यांना काही 'मिस्ड कॉल्स' आणि मेसेज आले होते, ज्यात म्हटलेलं, "मी अमिताभ बच्चन बोलतोय, कृपया तुमच्या सोयीनुसार मला परत फोन करा..." जेव्हा अभिनंदन यांनी 'बिग बीं'ना परत फोन केला, तेव्हा त्यांना अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, "अभिनंदन-जी, मी उत्तर प्रदेशचा आहे आणि मला अयोध्येत जमीन खरेदी करायचीय..." अभिनेत्यानं सुरुवातीला किंमतीबद्दल विचारणा केली आणि अभिनंदन यांनी त्यांना सांगितलं की, 15,000 चौरस फुटांच्या भूखंडाची किंमत 15 कोटी रुपये आहे. अमिताभ बच्चन यांनी दुसऱ्याच दिवशी 15 कोटी रुपये ट्रान्सफर केले आणि हा व्यवहार पूर्ण झाला.

अमिताभ बच्चन यांनी कुठे आणि किती गुंतवणूक केलीय? (Amitabh Bachchan Investing 90 Crore In Ayodhya)

  • सरयू प्लॉट: राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी खरेदी केलेला सुमारे 10,000 चौरस फुटांचा भूखंड, ज्याचे मूल्य सुमारे 14.5 कोटी रुपये आहे.
  • हवेली अवध: 4.54 कोटी रुपये मूल्याचा 5,372 चौरस फुटांचा भूखंड.
  • जवळील आलिशान भूखंड: सरयू विकास प्रकल्पाजवळ खरेदी केलेला 25,000 चौरस फुटांचा मोठा भूखंड, ज्याची किंमत सुमारे 40 कोटी रुपये आहे.
  • 67 एकर जमिनीचा भूखंड: त्यांची कौटुंबिक कंपनी 'एबी कॉर्प लिमिटेड' (AB Corp Ltd) द्वारे 35 कोटी रुपयांना खरेदी केलेला एक विशाल भूखंड.
  • हरिवंश राय बच्चन मेमोरियल ट्रस्ट: वडिलांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्यासाठी नोंदणीकृत केलेला 54,454 चौरस फुटांचा भूखंड.

रणबीर कपूर यांची गुंतवणूक (Ranbir Kapoor Investment)

रणबीर कपूर : अभिनेता रणबीर कपूर यानं अयोध्येतील आलिशान रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. 'रामायण' सिनेमात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारण्यापूर्वी, त्यानं खालील मालमत्ता खरेदी करून आपल्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओचा विस्तार केलाय...

सरयू टाउनशिपमधील भूखंडाविषयी

सरयू टाउनशिपमधील भूखंड : 2,134 चौरस फूट आकाराचा आणि 3.31 कोटी रुपये मूल्य असलेला एक प्रीमियम भूखंड. रणबीर कपूर यांनी या गुंतवणुकीचं वर्णन 'दैवी बोलावणे' आणि 'दीर्घकालीन कौटुंबिक वारसा' असं केलं आहे.

अयोध्या येथील पायाभूत सुविधांचा विकास

जगभरातील भाविकांसाठी अयोध्या हे एक प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी 85,000 कोटी रुपये खर्चाचे पायाभूत सुविधांचे प्रचंड प्रमाणावरील परिवर्तन सध्या सुरू आहे. यामध्ये महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अद्ययावत करण्यात आलेले अयोध्या धाम रेल्वे स्थानक आणि 187 किलोमीटर लांबीच्या 'नमो भारत कॉरिडॉर'ला मिळालेली मंजुरी यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे; हा कॉरिडॉर कानपूर आणि अयोध्या यांना अवघ्या 90 मिनिटांत जोडेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Amitabh Bachchan Purchase Land In Ayodhya Paid 15 Crore: "मी अमिताभ, मला अयोध्येत जमीन घ्यायचीय..."; पहाटे 3 वाजता 'बिग बीं'नी फिरवला फोन, दुसऱ्या दिवशीच उरकून टाकला कोट्यवधींचा व्यवहार

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
Nauheed Cyrusi on Miscarriages: 'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
Amol Kolhe On Savitribai Jyotiba Phule Serial: TV वरुन गाशा गुंडाळला, पण युट्यूबर येताच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं; 'सावित्रीबाई जोतीराव फुले'बाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
'टीआरपीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेम महत्त्वाचं...'; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
Devoleena Bhattacharjee: पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं
पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Embed widget