एक्स्प्लोर

Amitabh Bachchan Purchase Land In Ayodhya Paid 15 Crore: "मी अमिताभ, मला अयोध्येत जमीन घ्यायचीय..."; पहाटे 3 वाजता 'बिग बीं'नी फिरवला फोन, दुसऱ्या दिवशीच उरकून टाकला कोट्यवधींचा व्यवहार

Amitabh Bachchan Purchase Land In Ayodhya Paid 15 Crore: अमिताभ बच्चन यांनी रामनगरी अयोध्येत रातोंरात कोट्यवधींची जमिन खरेदी केलेली. त्यासाठी त्यांनी पहाटे 3 वाजता फोन केल्याचं समोर आलंय.

Amitabh Bachchan Purchase Land In Ayodhya Paid 15 Crore: अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) उभारणीमुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळाली नाही, तर पायाभूत सुविधांच्या विकासामुळे शहराच्या अर्थव्यवस्थेतही सुधारणा झालीय. बॉलिवूडमधील (Bollywood News) दिग्गज कलाकारांपासून ते बड्या उद्योजकांपर्यंत अनेकांनी अयोध्येत मोठी गुंतवणूक केलीय. राम मंदिराच्या उभारणीपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी (Bollywood Celebrity) रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी अयोध्येला (Ayodhya News) आपली पसंती दिल्याचं आपल्या कानावर आलं असेलच. यात सर्वात मोठं नाव होतं, बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं. त्यांनी अयोध्येतील राम मंदीर उभारणीनंतर रिअल इस्टेट क्षेत्रात जमिनीचे मोठे भूखंड खरेदी केले असून, तेथील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक म्हणून ते समोर आले आहेत. अमिताभ बच्चन यांनी रामनगरी अयोध्येत रातोंरात कोट्यवधींची जमिन खरेदी केलेली. 

'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा'चे संस्थापक आणि सीएमडी (CMD) अभिनंदन लोढा यांनी 'हिंदुस्तान टाइम्स इंडिया नेक्स्ट रिअल इस्टेट समिट 2026' मध्ये ही माहिती दिली. रिअल इस्टेट गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून अयोध्येची वाढती लोकप्रियता यावर चर्चा करताना त्यांनी अनेक रंजक किस्सेही सांगितले. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत जमीन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी त्यांना स्वतःहून फोन केला होता, असा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. 

'बिग बी' यांनी रात्री केलेला फोन (Big B Purchase Land In Ayodhya)

अभिनंदन लोढा यांनी 2023 मधील एका घटनेचा किस्सा सांगितला, जेव्हा ते ऑस्ट्रेलियात होते. एक दिवस पहाटे 3 वाजता त्यांना एक फोन आला. त्या फोनपूर्वी त्यांना काही 'मिस्ड कॉल्स' आणि मेसेज आले होते, ज्यात म्हटलेलं, "मी अमिताभ बच्चन बोलतोय, कृपया तुमच्या सोयीनुसार मला परत फोन करा..."

जेव्हा अभिनंदन यांनी 'बिग बीं'ना परत फोन केला, तेव्हा त्यांना अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, "अभिनंदन-जी, मी उत्तर प्रदेशचा आहे आणि मला अयोध्येत जमीन खरेदी करायचीय..." अभिनेत्यानं सुरुवातीला किंमतीबद्दल विचारणा केली आणि अभिनंदन यांनी त्यांना सांगितलं की, 15,000 चौरस फुटांच्या भूखंडाची किंमत 15 कोटी रुपये आहे. अमिताभ बच्चन यांनी दुसऱ्याच दिवशी 15 कोटी रुपये ट्रान्सफर केले आणि हा व्यवहार पूर्ण झाला.

अयोध्येत जमीन खरेदी करण्यासाठी इच्छुकांची गर्दी (Ayodhya Ram Mandir)

लोढा यांनी नमूद केलं की, भारतातील मंदिर-शहरांच्या आसपास सांस्कृतिक पर्यटनाचा विकास होत असल्यानं, ही शहरं ज्येष्ठ नागरिकांच्या वस्त्यांसाठी पसंतीची ठिकाणं बनत आहेत. परिणामी, यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासाची मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिलं की, व्हॅटिकन सिटीमध्ये दरवर्षी सुमारे 1 कोटी पर्यटक येतात, तर अयोध्येत ही संख्या सुमारे 25 कोटी इतकी आहे.

स्वाभाविकच, पर्यटकांचा हा प्रचंड ओघ आर्थिक विकासाचा वेग वाढवतो. स्थानिक रहिवाशांना त्यांच्या जमिनी चांगल्या दरात विकण्याची संधी मिळते, ज्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळते. विशेष म्हणजे, अयोध्येत गुंतवणूक करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींमध्ये बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि ख्यातनाम चित्रपट निर्माते आनंद पंडित यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

दूरदर्शनच्या 'रामायण'चा 'हा' अभिनेता, 13व्या वर्षीच थाटलेला संसार, सातवीत सुटली शाळा, अन् वयाची साठी ओलांडल्यानंतर झाले सुपरस्टार

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेंकडून क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; मराठी अभिनेत्याने त्याच्यासोबतचा लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेंकडून क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; मराठी अभिनेत्याने त्याच्यासोबतचा लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
Tv actress Crime News: चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
Salman Khans Sultan: दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
Ramayana Part 1: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Embed widget