Alia Bhatt : किंग खानच्या जवान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पण आलिया भट्टची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली...
Alia Bhatt on Jawan Movie Trailer : जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.
![Alia Bhatt : किंग खानच्या जवान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पण आलिया भट्टची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली... alia bhatt responds to part in shah rukh khan starrer jawan trailer marathi news Alia Bhatt : किंग खानच्या जवान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पण आलिया भट्टची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/01/4f51994a00e4ed5dc151abd7b291acf41693535394326358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Alia Bhatt on Jawan Movie Trailer : बॉलिवूडचा किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसतोय. तसेच, या ट्रेलरमधील डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. पण प्रत्यक्षात चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे आलिया भट्टचा उल्लेख करणारा संवादाने. या ट्रेलरवर आता अभिनेत्रीने आलिया भट्टने प्रतिक्रिया दिली आहे.
'जवान'च्या ट्रेलरवर आलिया भट्टची प्रतिक्रिया
'जवान' ट्रेलरमधील एका दृश्यात, शाहरुख खानचे पात्र मेट्रोला हायजॅक करते. नंतर, वाटाघाटी दरम्यान, नयनतारा, जी पोलिसाची भूमिका करते, तिला विचारते, 'ये बताओ तुम्हे चाहिये क्या?' ज्याला SRK उत्तर देतो "चाहिए तो आलिया भट्ट."
आलिया भट्टने इंस्टाग्रामवर ट्रेलर शेअर केला आणि त्यावर प्रतिक्रिया दिली. तिने लिहिले, "और गरीबी दुनिया को चाहिये सर एसआरके !!! @iamsrk किती शानदार ट्रेलर आहे."
आलिया भट्ट आणि शाहरुख खान यांनी 2016 मध्ये 'डियर जिंदगी' या चित्रपटात एकत्र काम केले होते. शाहरुखने आलिया आणि रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र: पार्ट वन - शिवा' मध्येही खास भूमिका साकारली होती. त्याने आलियाचा नेटफ्लिक्स चित्रपट 'डार्लिंग्स' देखील सह-निर्मिती केला होता.
जवान कधी होणार रिलीज?
जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज केला जाणार आहे. चित्रपटाचा प्री व्ह्यू आणि चित्रपटांमधील गाणी काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली.
'जवान'मधील गाण्यांना मिळाली नेटकऱ्यांची पसंती
जवान चित्रपटामधील 'जिंदा बंदा', 'चलेया' आणि 'नॉट रमैया वस्तावैया' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या गाण्यांना नेटकऱ्यांची पसंती मिळाली. या गाण्यांमध्ये शाहरुखचा हटके अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला.
जवान हा चित्रपट अॅटलीनं दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये सान्या मल्होत्रा,प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य यांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट शाहरुखच्या पठाण चित्रपटाप्रमाणेच बॉक्स ऑफिवर कोट्यवधींची कमाई करेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)