अक्षय कुमार अन् राणी मुखर्जी पहिल्यांदाच एकत्र; बहुप्रतिक्षित चित्रपटात झळकणार प्रमुख भूमिकेत
Akshay Kumar Returns with Rani Mukerji for the First Time Together: 'ओह माय गॉड' चित्रपटाच्या तिसऱ्या भागात अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी एकत्र दिसणार आहे. दोघेही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Akshay Kumar Returns with Rani Mukerji: 2026मध्ये अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) विविध चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तो 3 सिक्वेल चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 'जॉली एलएलबी', 'हाऊसफुल 5' आणि 'केसरी चॅप्टर 5' या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तो 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटातूनही प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास सज्ज झाला आहे. आता अक्षयच्या आणखी एका नव्या चित्रपटाबद्दल माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट देखील एक सिक्वेल चित्रपट आहे. 'ओह माय गॉड ३' या सिनेमात तो प्रमुख भूमिका साकारणार आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. अक्षय कुमार दोन्ही चित्रपटांमध्ये झळकला होता. दरम्यान, तो तिसर्या भागातही दिसणार आहे. या चित्रपटातील तिसर्या भागात मुख्य भूमिकेत अभिनेत्री राणी मुखर्जी दिसणार असल्याची माहिती आहे.
View this post on Instagram
निर्मात्यांनी या चित्रपटात अक्षय कुमारसोबत राणी मुखर्जीला कास्ट करण्यात आले आहे. पिंकव्हिलाच्या एका वृत्तानुसार, अमित राय यांनी 'ओह माय गॉड' या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. मागील दोन्ही भागांच्या तुलनेत तिसरा सिक्वेल हा भव्य दिव्य, अधिक संबंधित आणि हार्ड हिटिंग ठरेल, असा विश्वास फिल्ममेकर्सने व्यक्त केला. दरम्यान, मागील दोन भागांच्या यशानंतर अक्षय पुन्हा या फ्रँचायझीमध्ये सामील झाला आहे. 'ओह माय गॉड 3' या तिसऱ्या पार्टमध्ये अक्षय कुमारला पुन्हा झळकणार आहे. या चित्रपटात त्याला राणीचीही साथ असणार आहे. दोघांची जोडी पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सध्या या चित्रपटाचे प्री - प्रॉडक्शन सुरू झाले आहे. नंतर चित्रपटाचे शुटिंग करण्यात सुरू होईल. परंतु, निर्मात्यांकडून या चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अधिकृत घोषणा होताच या चित्रपटाव शिक्कामोर्तब करण्यात येईल. 'ओह माय गॉड' या चित्रपटाचा पहिला भाग उमेश शुक्ला यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाचा दुसरा भाग अमित राय यांनी दिग्दर्शित केला होता. आता तिसऱ्या सिक्वेलचं दिग्दर्शनही अमित राय करणार असल्याची माहिती आहे.
'ओह माय गॉड' चा पहिला भाग 2012मध्ये प्रदर्शित झाला होता. 20 कोटी रूपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात 149.90 कोटी रूपयांची कमाई केली होती. 'ओह माय गॉड'च्या दुसऱ्या भागाने 221.57 कोटी रूपयांची कमाई केली होती. या चित्रपटाचे बजेट 60 कोटी रूपये होते. दरम्यान, तिसरा भाग बॉक्स ऑफिसवर कसा कामगिरी करेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
























