एक्स्प्लोर

Aishwarya Narkar: 'हे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक.. ' ऐश्वर्या नारकर संतापल्या; Video करत  सांगितला घडलेला मोठा स्कॅम, म्हणाल्या ..

Aishwarya Narkar: एक प्रकार अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्यासोबत घडलाय . त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याविषयी माहिती दिली आहे

Aishwarya Narkar on Scam: मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) कायम आपल्या वेगवेगळ्या साड्यांच्या लुकमुळे चर्चेत असतात.  काही महिन्यांपूर्वी ऐश्वर्या नारकर अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि सुरुची अराडकर यांनी साड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. पण आजकालच्या जगात सगळे व्यवहार ऑनलाइन होत असताना अनेकदा फसवणुकीचे प्रकार समोर येताना दिसतात. असाच एक प्रकार अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्यासोबत घडलाय . त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. त्यांच्या साडीच्या ब्रँडच्या नावाचा वापर करून दुसरच कोणीतरी पैसे घेत असल्याचा प्रकार त्यांनी चाहत्यांना सांगितला. (Scam Alert)

नेमकं घडलं काय ?

ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतात. अनेक रील आणि फोटोशूटमधून चहा त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दलची माहिती त्या देतात. अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या एका स्कॅमबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या ' मी खूप घाईत हा व्हिडिओ करतेय. कारण आता जवळपास तिसरी चौथी वेळ आहे, आमच्या सोबत हे घडतंय. 'थ्रेड अँड ठुमका ' या आमच्या साडीच्या ब्रँडच्या नावाचा वापर करत कोणीतरी पैसे घेत आहे आणि ग्राहकांना साड्या देऊ असं खोटं आश्वासन देत आहे. त्यामुळे कृपया जर तुम्ही 'थ्रेड अँड ठुमका'ला पैसे पाठवत असाल, तेव्हा ते आमचं बिजनेस अकाउंट आहे की नाही हे तपासून घ्या. कारण आमच्या अकाउंटचं नावही तेच आहे. " असं ऐश्वर्या नारकर यांनी सांगितलं.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by TASvi (@threadandthumka)

त्यापुढे म्हणाल्या," आमच्या सोशल मीडिया अकाउंटच्या बायोमध्ये आमचा व्हाट्सअप नंबर दिलेला आहे. आम्हाला डीएम करू नका. जर तुम्हाला कमेंटमध्ये कोणी रिप्लाय देत असेल तर ते नंबर आमचे नाहीत. कमेंट मध्ये जर रिप्लाय करत आहेत ते नंबर फ्रॉड आहेत.आम्ही अनेकांना ब्लॉक केलंय. हे पेमेंट आमच्यापर्यंत येतच नाही. कारण हा मोठा स्कॅम आहे. त्यामुळे आम्ही साड्या डिलिव्हर करू शकत नाही. जेव्हा तुम्ही पेमेंट करता त्यावेळी बरोबर नंबर वापरलाय का हे चेक करा. हा स्कॅम सध्या बेसिक लेवलला सुरू असला तरी पुढे जाऊन हे वाढू शकतं. त्यामुळे पेमेंट करताना 'थ्रेड अँड ठुमका ' च्या बिझनेस अकाउंटला पेमेंट करा. जर आमच्या ब्रँडचं नाव नसेल तर पेमेंट करू नका.आम्हाला थेट मेसेज करा.अशा पद्धतीच्या स्कॅम पासून वाचा. आपल्या आजूबाजूला अशा चीप मेंटॅलिटीचे लोक असतात. हे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातात. त्यामुळे तुम्ही त्याला फसू नका. जागरूक रहा. '  असं ऐश्वर्या नारकर यांनी सांगितलं.

 

महत्त्वाच्या बातम्या

Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
Crime Petrol Host: अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Embed widget