![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
The Kashmir Files : ‘बिग बजेट’ चित्रपटांवरही भारी पडला ‘द कश्मीर फाइल्स’, तरीही विवेक अग्निहोत्रींना ‘या’ गोष्टीची खंत!
Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
![The Kashmir Files : ‘बिग बजेट’ चित्रपटांवरही भारी पडला ‘द कश्मीर फाइल्स’, तरीही विवेक अग्निहोत्रींना ‘या’ गोष्टीची खंत! After the big success of The Kashmir Files vivek agnihotri had this regret about this thing The Kashmir Files : ‘बिग बजेट’ चित्रपटांवरही भारी पडला ‘द कश्मीर फाइल्स’, तरीही विवेक अग्निहोत्रींना ‘या’ गोष्टीची खंत!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/23/c4a558a019dc1f9da4eda3e84b86c43d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
The Kashmir Files : काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडणारा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट पाहिल्यानंतर देशवासीयांमध्ये एक वेगळीच भावना जागृत झाली आहे. 90च्या दशकात काश्मिरी पंडितांवर खूप अत्याचार झाले, याची दाहकता या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक एकमेकांना याबद्दल भरभरून सांगत आहेत. अधिकाधिक लोक हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांकडे वळत आहेत.
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहणारा प्रत्येकजण भावूक होत आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.
…अशी इच्छा होती!
बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने चांगले यश मिळवले आहे, पण तरीही दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या मनात एक मोठी खंत आहे. याबद्दल बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, या चित्रपटाचा आशय इतका जबरदस्त आहे की, त्यात गाण्याला वावच नव्हता. पण, चित्रपटात काही लोकगीत असावीत अशी इच्छा होती. हे गाणे लता मंगेशकर यांनी गावे अशी, त्यांची इच्छा असल्याचे विवेक अग्निहोत्री यांनी सांगितले. पण, त्यांना हेही माहीत होतं की, त्या आता निवृत्त झाल्या आहेत आणि गाणी गात नाहीत.
‘ही’ खंत काय राहील
विवेक अग्निहोत्री म्हणाले की, ‘आम्ही त्यांना गाणे गाण्याची विनंती केली होती. ही विनंतीही त्यांनी मान्य केली होती. त्या माझी पत्नी पल्लवीच्या खूप जवळ होत्या. सगळं व्यवस्थित चाललं होतं. लतादीदी म्हणाल्या होत्या की, जर कोरोना संपला तर, त्या याची रेकॉर्डिंग करतील. पण, नंतर ते सर्व घडले ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. लता मंगेशकर यांच्यासोबत मी काम करू शकलो नाही, याची मला नेहमीच खंत वाटत राहील.’
कमी बजेटमध्ये चित्रपटाची जोरदार कमाई!
कमी बजेट चित्रपट आणि कमी स्क्रीन असूनही ‘द कश्मीर फाइल्स’ने चांगली ओपनिंग केली होती. 3.55 कोटींपासून सुरू झालेल्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवसापासून दुहेरी अंकात कमाई करणे सुरूच ठेवले आहे. अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी स्टारर या चित्रपटाला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची लोकप्रियता पाहता आता त्याच्या स्क्रीन्सचा आकडा 4000 वर पोहोचला आहे.
हेही वाचा :
- 'द कश्मीर फाइल्समध्ये अनेक गोष्टी असत्य, पण..'. संजय राऊत थेटच बोलले
- The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’च्या स्क्रीनिंगवेळी कोटात कलम 144, विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केला संताप!
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' ला गर्दी कोणाची? भाजपची की सामान्य प्रेक्षकांची?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)