एक्स्प्लोर

Dharmendra : दोन लग्नांनंतरही 27 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत होतं धर्मेंद्रंचं अफेअर, हेमा मालिनींनी कसा वाचवला होता संसार?

Dharmendra Anita Raj Affair: दोन लग्नं झाली असूनही, धर्मेंद्रचे त्याच्यापेक्षा 27 वर्षांनी लहान टीव्ही बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अफेअर होते.

Dharmendra Anita Raj Affair: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) त्यांच्या काळात चित्रपटसृष्टीवर राज्य करत होते. 1960 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली. 88 वर्षांचे असलेले धर्मेंद्र आजही चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसतात आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळतात. 

धर्मेंद्र त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत आहेत. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी वयाच्या 19 व्या वर्षी लग्न करणे असो किंवा हेमा मालिनी यांच्यासोबत पहिल्या लग्नाच्या 26 वर्षांनी लग्न करणं असो, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक गोष्टींमुळे धर्मेंद कायमच चर्चेत राहिले आहेत. एवढेच नाही तर दोनदा लग्न करूनही धर्मेंद्र एका बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते.

27 वर्षांनी लहान मुलीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र

दोनदा लग्न करूनही धर्मेंद्र यांचा मार्ग चुकला होता. आपल्यापेक्षा 27 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री अनिता राज यांच्यावर धर्मेंद्र यांचे प्रेम जडले. अनिताने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे, तर आता ती टीव्ही मालिकांमध्ये काम करत आहे. विशेष म्हणजे, अनिता आणि धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये स्क्रीन शेअर केली आहे.

या चित्रपटांमध्ये दिसली होती धर्मेंद्र-अनिता जोडी

आज धर्मेंद्र 88 वर्षांचे आहेत तर अनिता 61 वर्षांच्या आहेत. दोघांच्या वयात 27 वर्षांचा फरक आहे. या दोन्ही कलाकारांनी 'इन्सानियत के दुश्मन', 'नौकर बीवी का', 'जलजला' आणि 'करिश्मा कुदरत का' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. दरम्यान त्या दोघांचे अफेरही सुरु असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. 

हेमा मालिनी यांनी अनिताला  दिला होता इशारा

हेमालाही धर्मेंद्र आणि अनिता यांच्या अफेअरची माहिती झाली होती. अशा परिस्थितीत हेमा मालिनी या धर्मेंद्रसोबतचे लग्न मोडू शकल्या असत्या पण त्यांनी अनिताला धर्मेंद्रपासून दूर राहण्याची सक्त ताकीद दिली होती. यानंतर अनिता आणि धर्मेंद्र यांनी कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केले नाही.

धर्मेंद्र यांचे पहिले लग्न

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच धर्मेंद्रचे लग्न झाले होते. 1954 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी त्यांचे पहिले लग्न झाले होते. लग्नानंतर दोघेही चार मुलांचे पालक झाले. प्रकाश आणि धर्मेंद्र यांना अजिता देओल आणि विजेता देओल या दोन मुली आहेत, तर सनी देओल आणि बॉबी देओल ही दोन मुले आहेत.

हेमा मालिनीसोबत 26 वर्षांनी दुसरे लग्न

धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. हेमा मालिनीसोबतची त्यांची जोडीही मोठ्या पडद्यावर खूप आवडली होती. एकत्र काम करत असताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. पत्नी आणि चार मुले असूनही धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये हेमासोबत दुसरे लग्न केले. दोघांना ईशा देओल आणि आहाना देओल या दोन मुली आहेत.

ही बातमी वाचा : 

Anand Ingle : 'आता राग येण्यापेक्षा असहाय्य वाटतं...', लोकसभेच्या निकालाआधी आनंद इंगळेंनी व्यक्त केलं मत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडलेMaharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्याTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 27 September 2024 : ABP MajhaBhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Embed widget