Ae Nazaani Suno Na फेम अभिनेत्याची अवस्था 'सुशांत सिंग राजपूत'सारखी झाली होती, अभिनेत्री लवीनाला झाली होती अटक
Ae Nazaani Suno Na sonali bendre co actor kunal singh : फेम अभिनेत्याची अवस्था 'सुशांत सिंग राजपूत'सारखी झाली होती, प्रेयसीला करण्यात आली होती अटक

Ae Nazaani Suno Na sonali bendre co actor kunal singh : बॉलिवूडमध्ये काहीतरी करुन दाखवण्यासाठी हजारो लोक नशिब आजमावत असतात. यामध्ये काही लोक यशस्वी होतात तर काही जणांना अपयश येतं. मात्र, बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांना अल्पआयुष्य लाभलंय. अशा कलाकारांच्या यादीत सुशांत सिंग राजपूत, दिव्या भारती, जिया खान आणि प्रत्युषा बनर्जी यांच्यासारख्या कलाकारांची नावे घेता येतील. दरम्यान, आपण अशा कलाकाराबाबत जाणून घेऊयात...ज्याने अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali bendre) हिच्यासोबत काम केलंय. मात्र, त्याच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली होती.
Ae Nazaani Suno Na गाण्याने कुणाल सिंगला मिळाली होती प्रसिद्धी
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून कुणाल सिंग (actor kunal singh) आहे. 2000 च्या दशकात कुणालची लोकप्रियता प्रचंड होती. अभिनेत्याच्या अचानक मृत्यूच्या बातमीने सर्वांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्याच वेळी, अभिनेत्याच्या वडिलांनी असा दावा केला की त्यांच्या मुलाने आत्महत्या केली नाही तर त्याला चिथावणी देण्यात आली होती. कुणालने 1999 मध्ये 'कधलार धिनम' या चित्रपटात सोनाली बेंद्रेसोबत काम केले होते. हा चित्रपट इतका आवडला की नंतर तो हिंदीमध्ये डब करून 'दिल ही दिल में' या नावाने प्रदर्शित झाला.
त्यानंतर कुणालने (actor kunal singh) अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, नंतर जेव्हा कुणालचा एकही चित्रपट यशस्वी झाला नाही, तेव्हा त्याने असिस्टेंट एडिटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि चित्रपट निर्मिती देखील सुरू केली. दरम्यानच्या काळात कुणाल सिंगने (actor kunal singh) अनुराधा नावाच्या मुलीशी लग्न केले. लग्नानंतर तो दोन मुलींचा बाप झाला. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, अनुराधाला तिच्या पतीचे सह-अभिनेत्री लविना भाटियासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. परिणामी, अनुराधा कुणालला सोडून तिच्या मुलांसह तिच्या पालकांच्या घरी गेली.
7 फेब्रुवारी 2008 रोजी लविनाला कुणालचा (actor kunal singh) मृतदेह त्याच्या मुंबईतील घरात लटकलेला आढळला. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर, पोलिसांनी लविनाला ताब्यात घेतले कारण ती त्यावेळी घरी होती. तिच्या जबाबात लविनाने म्हटले आहे की, ती 10 मिनिटांसाठी वॉशरूममध्ये गेली होती आणि त्याच वेळी कुणालने गळफास घेतला. त्यानंतर, जेव्हा लविनाविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत, तेव्हा तिला सोडण्यात आले. पोलिसांनी असेही म्हटले आहे की, कुणाल कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट होता आणि जर कोणी त्याला इजा करण्याचा प्रयत्न केला असता तर तो स्वतःला वाचवू शकला असता. त्याच वेळी, अभिनेत्याचे वडील कर्नल राजेंद्र सिंग यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूमागे वेगळेच कारण असल्याचा दावा केला होता.
कुणाल सिंगच्या वडिलांनी सांगितले होते की, जेव्हा त्यांच्या मुलाचा मृतदेह रुग्णालयातून परत आणण्यात आला तेव्हा त्यावर जखमांच्या खुणा होत्या. असाही दावा केला की, प्रथम त्याच्या मुलाची हत्या करण्यात आली आणि नंतर त्याला आत्महत्या दाखवण्यासाठी फाशी देण्यात आली. कुणालच्या उजव्या हातावर एक खूण होती ज्यावरून असे दिसून आले की कोणीतरी त्याला मागून धरले असावे.
एवढेच नाही तर मानेवर गळा दाबून मारल्याच्या खुणाही दिसत होत्या. मृतदेहाकडे पाहून असे वाटत होते की जणू त्या व्यक्तीचा गळा दाबून खून करण्यात आला होता आणि नंतर त्याला फाशी देण्यात आली होती. कुणालच्या वडिलांनी म्हटले होते की, जेव्हा त्यावेळी फ्लॅटमध्ये कोणीतरी उपस्थित होते, तेव्हा तो आत्महत्या कशी करू शकतो. त्यांनी सांगितले की त्यांच्या मुलाने त्यांच्या मृत्यूच्या एक तास आधी संगीत दिग्दर्शक डब्बू मलिक यांना मेसेज केला होता आणि त्यांना घरी बोलावले होते. पोलिसांनी तथ्यांकडे दुर्लक्ष केले आणि 45 मिनिटांतच ती आत्महत्या असल्याचे घोषित केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या























