Adah Sharma : सुशांत सिंह राजपूतच्या घरी शिफ्ट झाली अदा शर्मा, म्हणाली, 'ही जागा मला सकारात्मक...'
Adah Sharma : बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्मा ही सुशांत सिंह राजपूतच्या घरात शिफ्ट झाली आहे. त्यानंतर तिची प्रतिक्रिया देखील समोर आलीये.
Adah Sharma : बस्तर, द केरला स्टोरी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) हीने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं वांद्रे येथील घर विकत घेतले आहे. त्यानंतर ती आता या घरात शिफ्ट झाल्याची बातमी समोर आली आहे. यावर अदा शर्मा हीने प्रतिक्रिया दिली असून तिने म्हटलं की, मी फक्त चार महिन्यांपूर्वीच सुशांतच्या घरात शिफ्ट झाले आहे आणि आता नवीन घरात पूर्णपणे सेटल देखील झालीये.
अदा शर्माने नुकतीच 'बॉम्बे टाइम्स'शी यासंदर्भात संवाद साधला. अदा शर्मा ही सुशांत सिंह राजपूतचे घर विकत घेणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून होत्या. त्यातच अनेकजण तिला हे घर विकत घेऊ नकोस, असाही सल्ला देत होते. पण तरीही अदाने हे घर आता विकत घेतले असून ती या घरात राहायला देखील गेली आहे.
अदा शर्माने काय म्हटलं?
यावर बोलताना अदा शर्मा म्हणाली की, 'मी चार महिन्यांपूर्वी फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. पण मी माझा चित्रपट 'बस्तर' आणि त्यानंतर 'द केरळ स्टोरी'च्या ओटीटी रिलीजमध्ये व्यस्त होते. त्यानंतर मी मथुरेच्या हत्ती अभयारण्यात काही काळ घालवला. अलीकडे मला काही वेळ सुट्टी मिळाली आणि मी या घरात राहायला आलो. त्याचप्रमाणे मला या घरात अत्यंत सकारात्मक उर्जा मिळत आहे.
अदाच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली
'द केरळ स्टोरी' या चित्रपटामधील अदाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटात अदा शर्मासोबतच योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी यांनी देखील प्रमुख बूमिका साकारली. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं आहे.
अदाचे चित्रपट
2008 मध्ये रिलीज झालेल्या विक्रम भट्टच्या 1920 या हॉरर चित्रपटामधून अदानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अदानं कमांडो 2, कमांडो 3 आणि बायपास रोडसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. आता अदाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.